(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
अहान पांडे आणि अनित पद्ढा स्टारर ‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट रोमँटिक-ड्रामाने भरलेला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्याची तुलना ‘आशिकी २’ शी केली. दरम्यान, आशिकी गर्ल श्रद्धा कपूरनेही हा चित्रपट पाहिला आणि त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. श्रद्धा कपूर याबद्दल काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.
श्रद्धा कपूरची ‘सैयारा’वर प्रतिक्रिया
अभिनेत्रीने चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘सैयारा’ पाहतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये श्रद्धाने लिहिले आहे की, ‘सैयरा से आशिकी हो गई है मुझे’. यानंतर, तिने चित्रपटातील एका दृश्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, ‘मी या क्षणासाठी चित्रपट ५ वेळा पाहेन.’ याशिवाय श्रद्धा म्हणाली, ‘शुद्ध सिनेमा, शुद्ध नाटक, शुद्ध जादू.’ तिने तिच्या चाहत्यांना असेही सांगितले की कोणताही चित्रपट पाहिल्यानंतर ती खूप दिवसांनी भावनिक झाली आहे.
खूप गंभीर आजाराने ग्रस्त होते राकेश रोशन? अखेर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, चाहत्यांना दिला संदेश
‘सैयारा’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
तीन दिवसांत ८० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या ‘सैयारा’ चित्रपटाने सोमवारच्या कसोटीतही चांगले गुण मिळवले आहेत. रविवारी ३५.७५ कोटी कमाई करणाऱ्या ‘सैयारा’ चित्रपटाने सोमवारी २२.५ कोटी कमाई केली आहे. सहसा सोमवारी चित्रपटांचे कलेक्शन खूपच कमी असते. अशा परिस्थितीत ‘सैयारा’ चित्रपटाचे कलेक्शनही कमी झाले आहे, परंतु तरीही ‘सैयारा’ चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. अशाप्रकारे, ‘सैयारा’ चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘सैयारा’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन १०५.७६ कोटींवर पोहोचले आहे.
या चित्रपटातून अहान-अनीतने केले बॉलीवूडमध्ये पदार्पण
या चित्रपटाद्वारे अनन्या पांडेचा चुलत भाऊ आणि चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडेने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याच्यासोबत, अनीत पद्ढा या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली आहे, अभिनेत्रीने यापूर्वीही काम केले आहे परंतु या चित्रपटातून तिने मुख्य भूमिका म्हणूनही पदार्पण केले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घातला आहे. त्यामधील गाणी देखील गाजत आहेत.