
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड स्टार श्रद्धा कपूरबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीला चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाली आहे. श्रद्धा कपूर सध्या “ईठा” चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. शूटिंग दरम्यान तिला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या टीमने अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
टीमने माहिती दिली, श्रद्धा कपूर तिच्या आगामी “ईठा” चित्रपटासाठी लावणी नृत्याचे चित्रीकरण करत होती. नऊवारी साडी, जड दागिने आणि कंबर पट्टा परिधान केल्याने, शूटिंग दरम्यान तिचा पाय फ्रॅक्चर झाला. माहितीनुसार श्रद्धाच्या दुखापतीमुळे चित्रपटाचे शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले आहे. टीम दोन आठवड्यांत पुन्हा काम सुरू करेल.
श्रद्धा कपूरचे सोशल मीडियावरील चाहतेही चिंतेत आहेत. तिच्या टीमने अद्याप अभिनेत्रीच्या आरोग्याबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाहीत. चित्रपटाचे चित्रीकरण मड आयलंडवर सुरू होते, जिथे श्रद्धा कपूरने नृत्य आणि अनेक भावनिक दृश्ये सादर केली. तिच्या दुखापतीमुळे निर्मात्यांनी चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रद्धा लवकरच बरी होईल आणि शूटिंगला परतेल अशी अपेक्षा आहे.
ईठा” या चित्रपटात श्रद्धा कपूर महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी राणी विठाबाई भाऊ यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र १ नोव्हेंबरपासूनच शूटिंगला सुरुवात झाली. सिनेमात रणदीप हुडा श्रद्धासोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील गावागावात शूटिंग लोकेशन फायनल केली गेली आहेत. सोलापूर, सातारा आणि कोल्हापूरचा यात समावेश आहे.१९५७ ते १९९० पर्यंत विठाबाई भाऊंनी महाराष्ट्राच्या लोकनृत्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.