Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिद्धार्थ मल्होत्रा ​​या अभिनेत्रीसह ‘परम सुंदरी’मध्ये करणार रोमान्स, चित्रपटाची प्रेमकहाणी असणार खास!

सिद्धार्थ मल्होत्राबद्दल बातमी होती की तो लवकरच एक थ्रिलर चित्रपट करणार आहे. परंतु आता दिग्दर्शकाने आपला विचार बदलला असून चित्रपटाची कथा रोमँटिक असेल असे समजले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 28, 2024 | 10:55 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

12 वर्षांपासून फिल्मी दुनियेवर राज्य करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ॲक्शन, थ्रिलर आणि रोमान्ससह प्रत्येक शैलीत त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. पुन्हा एकदा हा अभिनेता रोमँटिक ड्रामामध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राने 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटामधून करिअरला सुरुवात केली होती. तेव्हापासून अभिनेत्याने बहुतेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने आलिया भट्टपासून कियारा अडवाणी, कतरिना कैफ आणि श्रद्धा कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली आहे. आता तो जान्हवी कपूरसोबत चित्रपट करणार असल्याचे समोर आले आहे.

सिद्धार्थची जोडी जान्हवी कपूरसोबत जमणार
मिड-डेच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा ​​बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. तुषार जलोटा दिग्दर्शित चित्रपटाचे शीर्षक ‘परम सुंदरी’ आहे. तुषार अभिषेक बच्चनचा दासवी चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी ओळखला जातो. सिद्धार्थ आणि जान्हवी पहिल्यांदाच चाहत्यांना एकत्र दिसणार आहेत.

हे देखील वाचा – Bigg Boss 18 : बिग बॉसने घरात ‘Time God’ चा डंका वाजवला! कोण होणार नवा कॅप्टन?

काय आहे ‘परम सुंदरी’ चित्रपटाची कथा?
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी सिद्धार्थ आणि जान्हवी कपूरसोबत एक थ्रिलर चित्रपट बनवण्याची योजना होती, पण आता ती रोमँटिक कथा असणार आहे. ही कथा वेगवेगळ्या संस्कृतींशी संबंधित असलेल्या एका मुला आणि मुलीवर आधारित असेल. सिद्धार्थ दिल्लीतील एका श्रीमंत आणि देखणा व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो केरळमध्ये राहणाऱ्या जान्हवी कपूरच्या प्रेमात पडतो. यासगळ्यावर आधारित चित्रपटाची कथा चाहत्यांसाठी दिग्दर्शक घेऊन येत आहे. पहिल्यांदाच ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. तर शेरशाहनंतर सिद्धार्थलाही हवा तसा ब्रेक मिळालेला नाही. त्यामुळे आता या चित्रपटाकडून त्याच्या चाहत्यांना खूपच अपेक्षा आहेत आणि शिवाय जान्हवीसह त्याची जोडीदेखील कशी दिसणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

हे देखील वाचा – Surbhi Jyoti Wedding: सुरभी-सुमित अडकले विवाहबंधनात, वधू-वरांच्या फोटोंवर चाहत्यांचे वेधले लक्ष!

कधी होणार चित्रपटाचे शूटिंग सुरू?
तुषार जलोटा दिग्दर्शित ‘परम सुंदरी’ या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत पहिल्या शेड्यूलचे शूटिंग दिल्लीत होईल आणि त्यानंतर टीम केरळला रवाना होईल. उर्वरित दृश्यांचे चित्रीकरण मुंबईच्या स्टुडिओमध्ये होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग २०२५ पर्यंत पूर्ण होऊ शकते. दोन्ही स्टार्सची लुक टेस्टही झाली आहे. असे म्हटले जात आहे की हे शीर्षक मिमीच्या परम सुंदरी गाण्यावरून घेण्यात आले आहे, त्यामुळे या चित्रपटात  क्रिती सनॉनचा कॅमिओदेखील असू शकतो अशी चर्चा आहे. सध्या तरी या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे.

Web Title: Sidharth malhotra param sundari movie with actress janhvi kapoor movie genre rom com

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 10:47 AM

Topics:  

  • Janhvi Kapoor
  • Siddharth malhotra

संबंधित बातम्या

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?
1

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स
2

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स

श्रीदेवींच्या साडीत जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ‘होमबाउंड’च्या प्रीमियरमध्ये वेधलं लक्ष
3

श्रीदेवींच्या साडीत जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ‘होमबाउंड’च्या प्रीमियरमध्ये वेधलं लक्ष

TIFF मध्ये ‘होमबाउंड’ च्या प्रीमियरमध्ये जान्हवी कपूरचा जलवा; चाहत्यांसोबत काढले फोटो, दिले ऑटोग्राफ
4

TIFF मध्ये ‘होमबाउंड’ च्या प्रीमियरमध्ये जान्हवी कपूरचा जलवा; चाहत्यांसोबत काढले फोटो, दिले ऑटोग्राफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.