
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Kiara Advani-Sidharth Malhotra: अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. हे जोडपं पहिल्यांदाच एकत्र ‘कॉफी विथ करण 9’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये दिसणार आहे. करण जोहरच्या शोमध्ये सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या प्रेमकहाणीपासून ते वैवाहिक आयुष्यातील अनेक रंजक किस्से सांगताना दिसतील. नुकताच या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, त्यातील सिद्धार्थच्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘कॉफी विथ करण 9’च्या नव्या प्रोमोमध्ये करण जोहर सिद्धार्थ आणि कियारासोबत गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी करणने सिद्धार्थला विचारले की, त्याने कधी ऑफस्क्रीन किंवा कॅमेऱ्यामागे एखादी विशेष भूमिका साकारली आहे का? यावर सिद्धार्थने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, “आम्हाला काम घरी आणायचे नाही आणि बेडरूममध्ये तर नक्कीच नाही.” सिद्धार्थच्या या उत्तराने करणसह कियारालाही हसू आवरता आले नाही. त्याचा हा बेडरूम रूल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या गप्पांदरम्यान करणने सिद्धार्थ आणि कियाराला त्यांच्या डेट नाइटबद्दलही प्रश्न विचारला. त्यांची डेट नाइट केवळ डिनरपुरती मर्यादित राहत नाही, याची ते कशी खात्री करतात, असे करणने विचारले. यावर कियाराने तिच्या बेबी बंपकडे बोट दाखवत, “बस झालं, आता हे पूर्ण झालं,” असे गंमतीने उत्तर दिले. तिच्या या उत्तराने शोमध्ये एकच हशा पिकला.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी ७ ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. यापूर्वी २०२५ मध्ये या जोडप्याने त्यांच्या मुलगी सराईचे स्वागत केले होते. आता त्यांच्या कुटुंबात आणखी एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ‘कॉफी विथ करण 9’चा पाचवा एपिसोड बुधवारी संध्याकाळी ७ वाजता जिओ हॉटस्टारवरील ‘द पीकॉक हब’वर प्रदर्शित होणार आहे.