लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीने तिचा दीर्घकालीन बॉयफ्रेंड सुमित सुरीसोबत रविवार, २७ ऑक्टोबर रोजी विवाहबंधनात अडकली आहे. अशाप्रकारे या जोडप्याने त्यांच्या दीर्घकालीन नात्याला एक नाव दिले आहे. सुरभी ज्योतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. सुरभी ज्योती आणि सुमित सुरी यांचे फोटो सोशल मीडियावर दिसताच व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीच्या लग्नाच्या फोटोंवर सगळ्यांचे लक्ष वेधले आहेत. चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला लग्नासाठी प्रचंड शुभेच्छा देत आहेत.
पहा सुरभी ज्योतीचे लग्नाचे फोटोज. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सुरभी ज्योतीचे लग्न सुमित सुरीशी झाले आहे. सुरभी ज्योतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
सुरभी ज्योतीच्या फोटोंना चाहते चांगलाच प्रतिसाद देत असून, तिला लग्नाच्या शुभेच्छा देखील देताना दिसत आहेत. अभिनेत्रीने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लग्नाच्या शुभेच्छा... 27/10/2024'. असे लिहून तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
सुरभी ज्योतीने लग्नात लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच तिचा पती सुमित सुरीने क्रीम रंगाची शेरवानी घातली आहे. ज्यामध्ये दोघांचाही लुक पाहण्यासारखा आहे.
सुरभी ज्योती आणि सुमित सुरी यांनी हात जोडून पोज दिली. वधू-वरांचे फोटो पाहून चाहते कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आणि चाहत्यांना या दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला आहे.
सुरभी ज्योती आणि सुमित सुरी यांनी लग्नाच्या फोटोशूट मध्ये एकमेकांचा हात धरला आहे. दोघांच्या लग्नाच्या अल्बममधील हे छायाचित्र चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सुरभी ज्योतीने तिच्या हळदीची छायाचित्रे देखील चाहत्यांसाठी शेअर केली होती. ज्यामध्ये तिचा पती सुमित सुरीही दिसला होता. आणि या फोटोमध्ये दोघेही खूप खुश दिसत होते.