(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे शुक्रवारी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग अपघातात निधन झाले आहे. झुबिन गर्ग यांनी वयाच्या 52 व्या
वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डाइविंग करत असताना त्यांचा अपघात झाला, ज्यात ते समुद्रात पडले. त्यांना तातडीने रेस्क्यू करून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले,परंतु ते जखमी झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. झुबिन गर्ग सिंगापूरमध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवल मध्ये भाग घेण्यासाठी गेले होते, आणि त्यांना त्या फेस्टिवलमध्ये परफॉर्म करायचं होते.
पहिल्याच भूमिकेनं जिंकलं मन, जान्हवीची सिनेविश्वातील एंट्री साऱ्यांनाच भावली
20 आणि 21 सप्टेंबर रोजी संचटेक, सिंगापूर मध्ये त्यांचा परफॉर्मन्स होणार होता. झुबिन यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत फेस्टिवलचे आमंत्रण दिले होते. त्यात त्याने म्हटलं होतं “सिंगापूरमधील मित्रांनो, मी आपल्याला 4th नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवलमध्ये आमंत्रित करतो.
प्रियाच्या निधनानंतर शंतनु हळू-हळू सावरतोय, 15 दिवसांनी मालिकेत झाली एन्ट्री…
यामध्ये भारतीय उत्तरेतील विविध प्रकारचे आगरी, हस्तकला उत्पादने, चहा अनुभव, नृत्य प्रकार, फॅशन शो आणि संध्याकाळी संगीत कार्यक्रम असतील. मी त्या फेस्टिवलमध्ये कल्चरल ब्रँड अँबासॅडर म्हणून उपस्थित असेल आणि 20 तारखेला माझ्या लोकप्रिय हिंदी, बांग्ला आणि असामी गाण्यांवर परफॉर्म करणार आहे. कृपया सर्वांना आमंत्रित करतो, या कार्यक्रमात एंट्री मोफत आहे, आणि आम्हाला समर्थन देण्यासाठी सर्वांना येण्याचे आवाहन करतो.”अशी पोस्ट झुबिन यांनी दोन दिवसांपूर्वी पोस्ट केली होती.
आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनी झुबिन गर्ग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘झुबिन यांच्या संगीतात, अनेक पिढ्यांना आनंद, सांत्वन आणि ओळख मिळाली. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. आसामने त्यांच्या सर्वात प्रिय पुत्रांपैकी एक गमावला आहे. भारताने एक सर्वोत्तम कलाकार गमावला आहे. त्यांच्या आत्माला शांती लाभो’, असे अशोक सिंघल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.
Deeply saddened by the untimely demise of our beloved Zubeen Garg.
Assam has lost not just a voice, but a heartbeat. Zubeen da was more than a singer, he was the pride of Assam and the nation, whose songs carried our culture, our emotions, and our spirit to every corner of the…
— Ashok Singhal (@TheAshokSinghal) September 19, 2025