(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रियाच्या निधनानंतर शंतनु हळू-हळू सावरतोय, 15 दिवसांनी मालिकेत झाली एन्ट्री…
‘आरपार’ चित्रपटात ऋता-ललितसह चित्रपटातील इतरही कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने चित्रपटाची उंची वाढविली. दरम्यान, चित्रपटात झळकलेल्या नव्या चेहऱ्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं. ही नवी अभिनेत्री नक्की कोण?, असा प्रश्नही साऱ्यांना पडला. तर अभिनेत्री जान्हवी सावंत हिने ‘आरपार’ सिनेमातून सिनेविश्वात एंट्री केली. जान्हवीची सिनेविश्वातील एंट्री साऱ्यांना अधिक भावली. अभिनेत्री जान्हवी सावंत हा प्रवास आता जान्हवीने ‘आरपार’ या सिनेमातून सुरु केला आहे. या चित्रपटात तिने ललितची होणारी पत्नी ही भूमिका साकारली, मात्र ही भूमिका चित्रपटात ट्विस्ट येताच दूर गेली. तिची भूमिका, तिचा अभिनय, तिचे व्यक्तिसौंदर्य सारे काही प्रेक्षकांना भावले आणि आरपारमुळे जान्हवीला विशेष प्रेम मिळाले. नवोदित अभिनेत्री म्हणून जान्हवीचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे.
श्रद्धा कपूरचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली, ‘हे नखरे…’
एकूणच या प्रवासाबाबत जान्हवी म्हणाली, “‘आरपार’मुळे मला सिनेइंडस्ट्रीत येण्याची संधी मिळाली याबाबत मी साऱ्यांची ऋणी आहे. हा माझा पहिलाच चित्रपट आहे. आणि पहिल्यांदाच अभिनय करताना खूप चांगल्या सहकलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली हे माझं भाग्यच म्हणायला हवं. ‘आरपार’ चित्रपटाने मला खऱ्या अर्थाने सिनेविश्वातील मार्ग मोकळे करुन दिले आहेत. आता आणखी बऱ्याच प्रोजेक्टवर काम करायचं आहे आणि मी उत्सुक आहे”.






