(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
२०२५ हे वर्ष अक्षय कुमार आणि वीर पहारियासाठी खूप चांगले गेले आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘स्काय फोर्स’ बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करताना दिसत आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या चित्रपटाचे समीक्षकांसह प्रेक्षकांनीही खूप कौतुक केले आहे, ज्याचा फायदा चित्रपटाच्या कलेक्शनला होत असल्याचे दिसून येते आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
बऱ्याच काळानंतर अक्षयचे दमदार पुनरागमन
अक्षय कुमारचे नशीब गेल्या बऱ्याच काळापासून अडचणीत आहे. त्याचे याआधीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. तथापि, जानेवारी २०२५ चा महिना त्यांच्यासाठी आनंदाची भेट घेऊन आला आहे. बऱ्याच दिवसांनी अक्षयच्या एका चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चांगला व्यवसाय केला आहे. या चित्रपटामधील दोघांचेही काम खूप चांगले आहे.
‘द दिल्ली फाईल्स’चा टीझर आऊट, 2.21 मिनिट्समध्ये मिथुन चक्रवर्तींनी जिंकले चाहत्यांचे मन
चित्रपटाने दोन दिवसांत दिले शुभ संकेत
‘स्काय फोर्स’च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. चित्रपटाचे बजेट सुमारे १०० कोटी रुपये आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई १० टक्क्यांहून अधिक होती. ‘स्काय फोर्स’साठी हे एक चांगले संकेत होते. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये ७१.९ टक्क्यांची वाढ झाली. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ₹२६.३० कोटींची कमाई केली आहे. निर्मात्यांना ही कमाई पाहून नक्कीच आनंद झाला आहे.
तिसऱ्या दिवशी कमाईचा वेग आणखी वाढला
जर कोणताही चित्रपट प्रेक्षकांना आवडला तर सुट्टीच्या दिवशी त्याच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ दिसून येण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशीही स्काय फोर्सला सुट्टीचा पूर्ण फायदा मिळाल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, रविवारी चित्रपटाने २७.५ कोटी रुपये कमावले आहेत. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता ६९.१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. रात्री उशिरापर्यंत कमाईच्या आकडेवारीत मोठा बदल दिसून आला आहे.
चित्रपटात काय आहे खास?
संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर दिग्दर्शित ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धावर आधारित आहे. खास गोष्ट म्हणजे ८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटाचे चित्रीकरण अवघ्या १०० दिवसांत पूर्ण झाले. या चित्रपटात अक्षय कुमार आणि वीर पहारिया व्यतिरिक्त सारा अली खान आणि निमरत कौर देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा वीर पहारियाचा पहिला चित्रपट आहे. त्याने पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. ‘स्काय फोर्स’चे चित्रीकरण मुंबई, लखनौ, सीतापूर, अमृतसर, हैदराबाद, दिल्ली, पठाणकोट आणि युनायटेड किंग्डममध्ये झाले आहे.