बॉलिवूड आणि मराठी अभिनेता श्रेयस तळपदे हा त्याच्या उत्तम चित्रपटांसाठी आणि विनोदासाठी ओळखला जातो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हिट चित्रपटांबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. २०२४ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट असलेल्या 'पुष्पा २' च्या हिंदी आवृत्तीला आवाज देणारा स्टार श्रेयस तळपदे यांचा आज वाढदिवस आहे. श्रेयसने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्याने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करून चाहत्यांचे मन जिंकले आहेत. त्याचा अभिनय आणि भूमिका सगळ्या हिट आणि प्रेक्षकांच्या लक्षात राहण्यासारख्या आहेत.
पुष्पाचा आवाज बनून जिंकले चाहत्यांचे मन; जाणून घ्या या अभिनेत्याचे सर्वात हिट चित्रपट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
२००७ मध्ये प्रदर्शित झालेला 'ओम शांती ओम' हा चित्रपट ब्लॉकब्लस्टरमध्ये प्रचंड हिट ठरला. या चित्रपटात श्रेयसने पप्पू मास्टरची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूप आवडली.
२००८ मध्ये प्रदर्शित झालेला 'गोलमाल रिटर्न्स' हा चित्रपट देखील एक उत्तम विनोदी चित्रपट होता. या चित्रपटात श्रेयसने लक्ष्मणची भूमिका साकारली होती. तो त्याच्या विनोदी चित्रपटामुळे चर्चेत राहिला.
२०१० मध्ये आलेल्या 'गोलमाल ३' या चित्रपटात श्रेयसने उत्कृष्ट विनोदी पात्र साकारले होते. गोलमाल मालिकेतील श्रेयसच्या लक्ष्मणच्या भूमिकेबद्दल बरीच चर्चा झाली.
श्रेयस २०१२ मध्ये आलेल्या 'हाऊसफुल २' चित्रपटातही दिसला होता. या चित्रपटात श्रेयसने जयची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
२०१७ मध्ये प्रदर्शित झालेला 'गोलमाल अगेन' हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये हिट ठरला. या चित्रपटातही श्रेयसने एक उत्तम विनोदी भूमिका साकारली आहे.
श्रेयस तळपदे यांना त्यांच्या चित्रपटांसाठी अनेक मोठे पुरस्कारही मिळाले. श्रेयसला 'इकबाल डोर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आणि त्यानंतर 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट ऑन स्क्रीन फ्रेंड पुरस्कार मिळाला.
मुंबईत जन्मलेला अभिनेता श्रेयसने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय श्रेयस अनेक ओटीटी मालिकांमध्येही दिसला आहे. २०२४ मध्ये तो जिंदगीनामा या मालिकेतही दिसला होता. याशिवाय त्याने तीन दो पाच आणि बेबी कम ना या मालिकांमध्येही काम केले.