अभिनेता सोनू सूद लोकांना नेहमीच मदत करताना दिसत असतो तसेच चाहते कौतुकही करत आहेत. त्याने पुन्हा एकदा त्याची उदारता दाखवली आहे. अभिनेत्याने दिवंगत तेलुगू अभिनेता वेंकट राज उर्फ फिश वेंकट यांच्या कुटुंबाला मदत केली आहे. त्याने कुटुंबाला दीड लाख रुपये पाठवले आहेत. १८ जुलै रोजी किडनीच्या आजारामुळे हैदराबादमध्ये माश वेंकट यांचे निधन झाले. तसेच भविष्यात देखील अभिनेता त्याच्या कुटुंबाला मदत करेल असे म्हणाले आहे.
चित्रपटाच्या निवृत्तीनंतर अभिनेता Fahadh Faasil बनणार ड्रायव्हर, स्वतःच उघड केले ‘हे’ रहस्य
वेंकट यांना किडनीचा आजार होता
तेलुगू अभिनेता ५३ वर्षांचा होता आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्यांचे डायलिसिस सुरू होते. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या किडनी प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यांना सुमारे ५० लाख रुपयांची गरज होती. दुर्दैवाने, पैसे उभारण्यापूर्वीच वेंकट यांचे निधन झाले. तसेच आता अभिनेता सोनू सूदने त्याच्या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
वेंकटच्या निधनाने सोनू दु:खी झाला
सोनू सूदच्या टीमच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्यांना आशा होती की वेंकट अजूनही रुग्णालयात आहे आणि तो बरा होऊ शकतो. परंतु अभिनेत्याने आधीच अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला. हे ऐकून सोनू सूदला ‘धक्का’ बसला. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सोनूने वेंकटच्या पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी फोनवर बोलून गरज पडल्यास तो त्यांना मदत करेल असे आश्वासन दिले. वेंकटच्या पत्नीला दिलासा मिळाला कारण तिचा पती नेहमीच सोनू सूदची प्रशंसा करत असे.
‘सुशांतसोबत जे झाले ते माझे ही होणार…’ तनुश्रीचे दत्ताचे बॉलीवूडवर गंभीर आरोप, नक्की काय आहे प्रकरण?
वेंकटच्या कुटुंबाला यापूर्वी आर्थिक मदत मिळाली नव्हती
यापूर्वी असे वृत्त आले होते की अभिनेता प्रभासने वेंकटच्या किडनी प्रत्यारोपणासाठी ५० लाख रुपये देऊ केले होते. नंतर कुटुंबाने स्पष्ट केले की त्यांना ही रक्कम कधीच मिळाली नाही. फ्री प्रेस जर्नलने कुटुंबातील एका सदस्याचा हवाला देत म्हटले आहे की ‘कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आम्हाला प्रभास अण्णाचा सहाय्यक असल्याचे भासवून फोन केला. नंतर आम्हाला कळले की हा एक बनावट कॉल होता. प्रभासला हे माहितही नव्हते की असे काहीतरी घडत आहे. आम्हाला अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.’ वेंकटच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याने ‘अधुर्स’, ‘गब्बर सिंग’, ‘शिवम’ आणि ‘खैदी नंबर 150’ सारख्या अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.