Sonu Sood
सोनू सूद केवळ त्याच्या अभिनय कौशल्यासाठीच नव्हे तर त्याच्या फिटनेसच्या समर्पणासाठी देखील ओळखला जातो. त्याच्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये अभिनेत्याने त्याच्या ॲब्सचा एक नवीन फोटो शेअर केला आहे. सोनू सूदला पीक फॉर्ममध्ये कॅप्चर करणारा फोटो त्वरीत व्हायरल झाला. त्याने चाहत्यांचे आणि फिटनेस उत्साहींचे लक्ष वेधून घेतले आहे. चाहते त्याच्या शरीराकडे अधिक लक्ष देण्यास प्रवृत्त झाले आहेत. चाहत्यांनी त्याच्या फिटनेसवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
सोनू सूदने शेअर केलेल्या पोस्ट मधील ऍब्स आणि एकूणच ऍथलेटिक बिल्ट त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा पुरावा म्हणून हे स्पष्ट होत आहे. पूर्वी अभिनेत्याने उघड केले की तो त्याच्या दिवसातील किमान दोन तास फिटनेससाठी समर्पित करतो ज्यामध्ये धावणे, सायकल चालवणे आणि इतर प्रकारचे वर्कआउटचा यामध्ये समाविष्ट आहे. सोनू सूद अभिनयाबरोबरच चाहत्यांना त्याच्या फिटनेससाठी आवडला जातो.
सध्या सोनू त्याच्या आगामी ‘फतेह’ चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहे, हा चित्रपट एक सायबर क्राइम थ्रिलरवर आधारित असणार आहे. या सिनेमातून सोनू सूद दिग्दर्शनात पदार्पण करताना दिसणार आहे. नवीन पोस्टर आणि काही खास BTS फोटो पोस्ट करून ही घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सूद यांनी या बद्दल ची उत्सुकता व्यक्त केली आहे.‘फतेह’ हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे.
हे देखील वाचा- ‘फतेह’च्या रिलीजच्या तारखेची घोषणा आणि चाहत्यांनी सोनू सूदला वाढदिवशी दिली खास भेट!
वर्षानुवर्षे आपल्या अभिनयाची जादू चालवणाऱ्या सोनू सूदने फतेह या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून नवा प्रवास सुरू केल्याची माहिती दिली आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि विजय राज देखील दिसणार आहेत. अंकुर पजनीसह सोनू सूदने चित्रपटाची कथा लिहिली आहे. असे आता या चित्रपटाची आतुरता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.