(फोटो सौजन्य-Instagram)
अभिनेता सोनू सूदच्या चाहत्यांनी अलीकडेच राष्ट्रीय नायकाचा अनोखा सन्मान केला जे भावून अभिनेता चाहत्यांसोबत भावुक होताना दिसला. चक्क 100 फूट उंच पोस्टर बनवून त्याला वाढदवसानिमित्त खास शुभेच्छा देऊन चाहत्यांनी त्याचे खास अभिनंदन केले. सोनू सूदच्या प्रेक्षकांची मन जिंकणारा हा खास सन्मान अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आगामी चित्रपट ‘फतेह’ च्या रिलीज तारखेच्या घोषणेनंतर करण्यात आला होता. जे पाहून सोनू सूदला जास्त आनंद झाला.
सोनू सूदने घोषणा केली की ‘फतेह’ 10 जानेवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे ही घोषणा अगदी नवीन पोस्टरसह करण्यात आली होती. हे पाहून चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शन निर्मित हा चित्रपट सोनू सूदच्या दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. हॉलिवूड कलाकारांच्या बरोबरीने राहण्याचे वचन देणारा हा अभिनेता सायबर क्राइमच्या वास्तविक जीवनातील रोमांचक गोष्ट दाखवणार आहे. जी कथा आणि या चित्रपटामधील कलाकार पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
सोनू सूद व्यतिरिक्त, ‘फतेह’ मध्ये दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह हे हॅकरची भूमिका साकारताना प्रेक्षकांना दिसणार आहे आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस देखील सोनू सूदसह मुख्यभूमीकेत काम करताना दिसणार आहे. सूदने पोस्ट टाकताच त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देऊन कौतुकाचा वर्षाव केला. तो म्हणाला की ही कथा “महत्त्वपूर्ण” आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे. शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित, ‘फतेह’ मध्ये सूद नसीरुद्दीन शाह आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सोनू सूदचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणारा ‘फतेह’ सायबर क्राइमच्या वास्तविक जीवनातील घटनां वर आधारित असून झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट भारतीय कलाकारांना त्याच्या ॲक्शन सीक्वेन्ससह पर्वणी देणार आहे.
हे देखील वाचा- सोनू सूदने त्याच्या वाढदिवशी आगामी चित्रपट ‘फतेह’ ची रिलीज डेट केली जाहीर!
वर्षानुवर्षे आपल्या अभिनयाची जादू चालवणाऱ्या सोनू सूदने फतेह या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून नवा प्रवास सुरू केल्याची माहिती दिली आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि विजय राज देखील दिसणार आहेत. अंकुर पजनीसह सोनू सूदने चित्रपटाची कथा लिहिली आहे. असे आता या चित्रपटाची आतुरता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.