(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अलीकडे, प्रॉडक्शन हाऊस KVN प्रॉडक्शन्सने सोशल मीडियावर आगामी अपडेटबद्दल पोस्ट केले होते, परंतु थोड्याच वेळात ते काढून टाकण्यात आले. तसेच चाहत्यांनी पोस्टचे स्क्रीनशॉट घेतले. हे पोस्टर यशच्या टॉक्सिक चित्रपटाचे आहे. त्याचवेळी ‘टॉक्सिक’ चित्रपटामधील अभिनेता यशचा एक खास लूक खास दिवशी प्रदर्शित होणार असल्याचीही माहिती देण्यात अली होती. जाणून घेऊयात कोणत्या खास दिवशी ‘टॉक्सिक’मधील यशचा पॉवरफुल लूक प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
Surprises don’t knock .. they are unleashed.#TOXIC #TOXICTheMovie @TheNameIsYash #GeetuMohandas @KVNProductions #MonsterMindCreations @Toxic_themovie pic.twitter.com/Yj3zeg1GXE
— KVN Productions (@KvnProductions) January 6, 2025
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘टॉक्सिक’ चित्रपटाचे निर्माते ‘8 जानेवारी 2025’ रोजी यशच्या वाढदिवसानिमित्त प्रोमो रिलीज करू शकतात. एवढेच नाही तर निर्माते यशचे फर्स्ट लूक पोस्टर त्याच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात असल्याचे देखील समोर आले आहे. प्रॉडक्शन हाऊसने एक अपडेट पोस्ट केल्यानंतर आणि ताबडतोब हटवल्यानंतर या चित्रपटाच्या पोस्टरची चर्चा वाढली आहे, ज्यामुळे चाहत्यांना टॉक्सिकमधील यशचा दमदार लूक पाहण्यासाठी आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्री ‘टॉक्सिक’ चित्रपटामध्ये मध्ये दिसणार आहेत. टॉक्सिक हा हाय ऑक्टेन गँगस्टर ड्रामा चित्रपट असणार आहे.
चित्रपट निर्मात्यांनी आधीच एक प्री-लूक पोस्टर रिलीज केले आहे, ज्यामध्ये यश एका विंटेज कारच्या मागे अंधुक प्रकाशात उभा असल्याचे दाखवले आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला आहे. या पोस्टरवर स्पष्टपणे लिहिले आहे की यशचा फर्स्ट लूक यशच्या वाढदिवसाला म्हणजेच 8 जानेवारीला रिलीज होणार आहे. यशचा लूक सकाळी 10.25 वाजता प्रदर्शित होईल असेही यामध्ये लिहिले आहे. याची माहिती यशने त्याच्या इंस्टाग्रामवरही चाहत्यांसह शेअर केली आहे. गीतू मोहनदास यांच्या उत्कृष्ट कलाकार आणि दिग्दर्शनासह, केव्हीएन प्रॉडक्शनद्वारे टॉक्सिकची निर्मिती केली जात आहे. टॉक्सिक हा चित्रपट २०२५ यावर्षीच प्रदर्शित होणार आहे. चाहते अधिक काळापासून प्रतीक्षा केल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.