(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
२०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा तुरुंगातूनच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पत्र लिहिले आहे. जॅकलिनच्या आईच्या निधनानंतर सुकेशने नुकतेच हे भावनिक पत्र लिहिले आहे. सुकेशने बालीमध्ये किमला लिली आणि ट्यूलिपने भरलेली बाग तिच्या आईला श्रद्धांजली म्हणून अभिनेत्रीला भेट दिले आहे. पत्रात सुकेशने जॅकलिनच्या आईसाठी देखल भावुक नोट लिहिली आहे. तसेच त्याने अभिनेत्रीच्या आईची आठवण देखील काढली आहे. आता नेमकं या पत्रामध्ये तो काय म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत.
आईला समर्पित केले बाग
जॅकलिनसाठी पत्रात, सुकेशने लिहिले की, “मी बालीमधील बेटाचा एक मोठा भाग विकत घेतला आहे जिथे शेती चालत होती. आता ते किम गार्डन नावाचे पूर्णपणे खाजगी बाग आहे ज्याचे मालक जॅकलिन फर्नांडिस आहेत. आज मी तुम्हाला आईच्या स्मृतीप्रित्यर्थ ईस्टर भेट म्हणून ही बाग भेट देत आहे. मी तुम्हाला सांत्वन देण्याचा आणि या वाईट काळात मी तुमच्यासोबत आहे असे वाटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक तिथे असल्याचे भासवतील, परंतु केवळ त्यांच्या स्वतःच्या हेतूंसाठी. मला खात्री आहे की तुम्हाला हे माहित असेल.” असं त्याने या पत्रामध्ये लिहिले आहे.
जॅकलीनच्या आईसाठी चर्चमध्ये प्रार्थना केली
सुकेशने पत्रात पश्चात्ताप व्यक्त केला आहे आणि जॅकलिनच्या दिवंगत आईने त्याच्याबद्दल कोणताही राग मनात ठेवला नसेल अशी आशा व्यक्त केली आहे. या भावनिक संदेशात, सुकेशने विश्वास व्यक्त केला की किमचा त्यांचा पुनर्जन्म या दोघांच्या मुलीच्या रूपात होईल. सुकेशने जॅकलीनला तिच्या आईला समर्पित केलेली खास भेट पाहण्याचा आग्रह केला, ज्यामुळे तिला तिथे तिच्या आईची उपस्थिती जाणवेल आणि अभिनेत्रीला तिची आई आठवेल. सुकेशने असेही सांगितले की, त्याने तिथे तिच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्हॅटिकनमध्ये एक विशेष प्रार्थना सभा आयोजित केली होती, जे तिच्या आईचे आवडते चर्च होते.
पहलगाम हल्ल्यानंतर Vaani Kapoor का झाली ट्रोल? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केली टीका!
आई नेहमीच आपल्यासोबत असेल
सुकेश पुढे जॅकलीनला उद्देशून म्हणाला, “आई आपल्यासोबत आहे, आपल्या आत आहे आणि आपल्याभोवती एक देवदूत म्हणून आपले संरक्षण करत आहे. तुम्ही ज्या वेदनांमधून जात आहात ते मला माहित आहे, पण मला जास्त वेदना होत आहेत. कारण खूप कमी वेळासाठी तुमच्या आईच्या जवळ होतो. त्या इतक्या लवकर गेल्या आणि मी त्यांच्यासाठी तिथे काही करू शकलो नाही आणि आता त्या गेल्या आहेत यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. आई मला काय म्हणाली आणि २०२१ मध्ये माझ्या वाढदिवशी तिने मला लिहिलेली चिठ्ठी आठवते. मी आईला दिलेले वचन पाळेन.” असं त्याने या पत्रात लिहिले आहे. तसेच जॅकलिन फर्नांडिसच्या आईचे ६ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.