Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बाबांनी हे मृत्युपत्र…”, संजय कपूर यांचे मृत्युपत्र खरोखरच बनावट ? करिष्माच्या मुलांचा कोर्टाला जबाब

करिश्मा कपूरची मुले समायरा कपूर आणि कियान राज कपूर यांनी न्यायालयात त्यांचा जबाब नोंदवला आहे. वडील संजय कपूर यांनी मृत्युपत्र खरोखरच लिहिले आहे की नाही याबद्दल मुलांनी सांगितले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 15, 2025 | 12:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • संजय कपूर यांचे मृत्युपत्र खरोखरच बनावट ?
  • करिष्माच्या मुलांचा कोर्टाला सांगितले सत्य
  • करिश्मा कपूरच्या वकिलांनी केले गंभीर आरोप
अभिनेत्री करिश्मा कपूरची मुले, समायरा कपूर आणि कियान राज कपूर यांनी त्यांचे दिवंगत वडील संजय कपूर यांच्या कथित मृत्युपत्रात फेरफार केल्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, मुलांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की मृत्युपत्र खरे असू शकत नाही, कारण त्यात स्त्रीलिंगी सर्वनामांचा वापर केला आहे आणि त्यात “तिची शेवटची इच्छा”, “ती” आणि “तिची उपस्थिती” असे शब्द आहेत, ज्यामुळे मृत्युपत्र प्रत्यक्षात कोणी लिहिले याबद्दल शंका निर्माण होते.

करिश्मा कपूरच्या वकिलांनी केले गंभीर आरोप
दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, वकिलांनी सांगितले की संजय कपूर यांनी लिहिलेले मृत्यूपत्र नाही आहे. या संपूर्ण पात्रात संपूर्णपणे स्त्रीलिंगी शब्द वापरलेले दिसत आहे, जणू काही एखाद्या महिलेने मृत्युपत्र लिहिले आहे. जर ते खरोखर संजय कपूर यांनी लिहिले असते, तर त्याने कधीही इतकी गंभीर चूक लिखाण केले नसते. त्यात “तिची शेवटची इच्छा”, “तिची साक्ष” असे लिहिले आहे, जरी संजय कपूर एक पुरुष होते. हे हास्यास्पद आहे आणि हे दर्शवते की मृत्युपत्र दुसऱ्या कोणीतरी तयार केले होते.

सलमान खानने मित्राच्या फॅशन शोमध्ये पहिल्यांदाच केला रॅम्प वॉक, काळ्या शेरवानीमध्ये ‘भाईजान’चा दिसला स्वॅग

मृत्युपत्र लिहिणाऱ्याचे नाव लपवण्यात आले होते
दिल्ली उच्च न्यायालयातील वकिलाने असेही म्हटले आहे की मुलांची सावत्र आई प्रिया कपूर आणि इतर पक्ष मृत्युपत्र कोणी तयार केले याबद्दल मौन आहेत. त्यांनी आरोप केला की मृत्युपत्राच्या वास्तविक लेखक किंवा मसुदा तयार करणाऱ्याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. जर हे खरे मृत्युपत्र असेल तर इतकी गुप्तता का पाळली जात आहे? सुनावणीदरम्यान मुलांनी असेही निदर्शनास आणून दिले की संजय कपूर यांनी मृत्युपत्रात त्यांच्या मुलीचे पत्ते चुकीचे लिहिले आहे आणि त्यांच्या मुलाचे नाव अनेक ठिकाणी चुकीचे लिहिले आहे. वकिलाने सांगितले की हे सर्व सूचित करते की मृत्युपत्र दुसऱ्या कोणीतरी बनावट आणि तयार केले आहे.

करिश्माच्या मुलांनी यापूर्वी प्रिया कपूरवर केले आरोप
करिश्माच्या मुलांनी यापूर्वी प्रिया कपूरवर दिल्ली उच्च न्यायालयात लोभ आणि फसवणूकीचा आरोप केला आहे. मागील सुनावणीत त्यांच्या वकिलांनी सांगितले की प्रिया कपूरने स्वतःसाठी आणि तिच्या मुलासाठी बहुतेक मालमत्ता मिळवली होती. त्यांचा दावा आहे की प्रिया कपूरला संजय कपूरच्या मालमत्तेपैकी सुमारे 60 टक्के, तर त्यांच्या मुलाला 12 टक्के वारसा मिळाला होता आणि ते कुटुंबाच्या ट्रस्टचा 75 टक्के भाग नियंत्रित करत होते.

‘कपडे घालून बोल…’, ‘बिग बॉस १९’ मध्ये मालती चहरने ओलांडल्या सर्व मर्यादा, नेहलबद्दल केली अश्लील कंमेंट

संजय कपूरच्या मृत्युपत्रात छेडछाड
अभिनेत्री करिश्मा कपूरच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की ही सिंड्रेलाची सावत्र आईसारखी कथा आहे. प्रिया कपूरला मुलांच्या वाट्याला मर्यादा घालण्याची घाई होती. त्यांनी कागदपत्रे खोटी असल्याचा आरोप केला आणि न्यायालयाला यथास्थिती ठेवण्याची विनंती केली. मुलांनी असाही युक्तिवाद केला की संजय कपूरने अंदाजे ३०,००० कोटी रुपयांचे इतके मोठे मृत्युपत्र करण्यापूर्वी वकिलाचा सल्ला घेतला नाही हे अविश्वसनीय आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणार आहे.

 

Web Title: Sunjay kapur rs 30000 crore inheritance dispute karismas kids call priya kapur gambler

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • entertainment

संबंधित बातम्या

काय खरं, काय खोटं? धनुष-मृणाल ठाकूरच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम; सत्य आलं समोर
1

काय खरं, काय खोटं? धनुष-मृणाल ठाकूरच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम; सत्य आलं समोर

“अक्षय खन्ना 10/10 आहे, पण रणवीर 100/10”, ‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या अभिनयावर सुनील शेट्टी फिदा, म्हणाले…
2

“अक्षय खन्ना 10/10 आहे, पण रणवीर 100/10”, ‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या अभिनयावर सुनील शेट्टी फिदा, म्हणाले…

VVAN: सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त ‘वन फोर्स ऑफ द फॉरेस्ट’च्या निर्मात्यांकडून खास शुभेच्छा
3

VVAN: सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त ‘वन फोर्स ऑफ द फॉरेस्ट’च्या निर्मात्यांकडून खास शुभेच्छा

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!
4

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.