(फोटो सौजन्य - अकाउंट)
सध्या सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांचा ‘जाट’ हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दुसरीकडे, दक्षिणेतील अभिनेता अजित कुमारच्या ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे. याशिवाय, अक्षय कुमारचा ‘केसरी २’ हा चित्रपट १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. याचदरम्यान आता, ‘जाट’ हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे, तर अजित कुमारच्या ‘गुड बॅड अग्ली’ने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’सह अनेक हिंदी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. दोन्ही चित्रपटांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्ट आता आपण जाणून घेणार आहोत.
‘जाट’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन
बॉलिवूड सुपरस्टार सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांचा ‘जाट’ हा अॅक्शन चित्रपट १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, गेल्या सोमवारी चित्रपटाने ७.२५ कोटी रुपये कमावले होते. तर मंगळवारी त्याने ६ कोटी रुपये कमावले. ‘जाट’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता ५३.५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
विकी कौशलने हिसकावला ‘Pushpa’चा राष्ट्रीय पुरस्कार? ‘Chhaava’ ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रतिसाद!
उत्तर भारतात ‘जाट’ खूप पसंत केले जात आहे. त्याचा परिणाम चित्रपटाच्या सरासरी १३.०७% ऑक्युपन्सी रेटमध्ये दिसू येत आहे. चित्रपटाच्या सकाळच्या शोला ८.१३% गर्दी होती, तर दुपारच्या शोला १८.०१% गर्दी होती. अर्थात, सनी देओल आणि रणदीप हुड्डा व्यतिरिक्त, विनीत कुमार सिंग आणि सैयामी खेर सारखे कलाकार देखील गोपीचंद मालीनेनी दिग्दर्शित ‘जाट’ चित्रपटात दिसले आहेत.
‘गुड बॅड अग्ली’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
दुसरीकडे, दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकामागून एक रेकॉर्ड मोडत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये एकूण २९ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. अवघ्या ५ दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला. यासह, अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’ हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट बनला आहे.
लारा दत्ताने कसा जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा ताज ? ‘या’ उत्तराने अभिनेत्रीने जिंकले परिक्षकांचे मन
चित्रपटाने ‘पुष्पा’चा मोडला रेकॉर्ड
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, अजित कुमारच्या ‘गुड बॅड अग्ली’ने रिलीजच्या सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ६.५० कोटी रुपये कमावले आहेत. एकूण १०६.४५ कोटी रुपयांच्या कमाईसह, या चित्रपटाने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (१०६.३५ कोटी रुपये) चा विक्रम मोडला आहे. या चित्रपटाने ‘ड्रीम गर्ल २’ (₹१०६.७१ कोटी), ‘एक व्हिलन’ (₹१०५.७६ कोटी) आणि ‘सन ऑफ सरदार’ (₹१०५.१ कोटी) सारख्या इतर अनेक हिंदी चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.