Untold Facts About Actress Lara Dutta Miss Universe Question And Answer
बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ताचा (Lara Dutta) आज (१६ एप्रिल) वाढदिवस आहे. लाराने खूप चित्रपटांमध्ये काम केले नाही, परंतु तिने ज्या भूमिका केल्या त्या तिच्या चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या. ‘भागम भाग’ असो वा ‘पार्टनर’ प्रत्येक धाटणीच्या चित्रपटात अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची छाप सोडली. आज लारा दत्ता (Lara Dutta) तिचा ४७ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. तिचा जन्म १६ एप्रिल १९७८ रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे झाला.
संकर्षण कऱ्हाडेची मित्रासाठी खास पोस्ट; म्हणाला, “तो कायमच माझ्यासोबत…”
लाराचे वडील एल. के. दत्ता पंजाबी आहेत, तर आई जेनिफर दत्ता अँग्लो इंडियन आहे. १९८१ मध्ये दत्ता कुटुंब गाझियाबादहून बंगळुरूला स्थलांतरित झाले, त्यानंतर लारानी येथूनच तिचे शिक्षण पूर्ण केले. सौंदर्यवती अभिनेत्री लारा दत्ताने अर्थशास्त्रात पदवीधर आहे. फारशी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसलेल्या लाराने आपल्या फिल्मी करियरमध्ये एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. फिल्म इंडस्ट्रीतील कोणतीही पार्श्वभूमी नसताना लाराने बॉलिवूडमध्ये स्वत: ची प्रतिमा तयार केलेली आहे. तिने २००० मध्ये मिस युनिव्हर्सचा ताज पटकवला होता.
“हा कुठला इतिहास आहे?”, आस्ताद काळेच्या ‘छावा’ चित्रपटाबद्दलच्या पोस्ट व्हायरल; केली थेट टीका
आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या ह्या विजेतेपदामागील किस्सा जाणून घेणार आहोत. मिस युनिव्हर्सची स्पर्धा जिंकल्यानंतर लारा रातोरात प्रसिद्ध झाली. ‘मिस युनिव्हर्स’ची स्पर्धा जिंकण्यासाठी अंतिम फेरीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्यात आला होता, स्पर्धकांच्या उत्तरांच्या आधारे विजेत्याचा निर्णय घ्यायचा होता. असाच एक अवघड प्रश्न लारा दत्ताला विचारण्यात आला, ज्याचे तिने इतक्या सुंदर पद्धतीने उत्तर दिले की तिला स्पर्धेची विजेती घोषित करण्यात आले. ” ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा महिलांचा अनादर करणारी आहे, असं म्हणत बाहेर आंदोलन सुरू आहे. त्यांना तुम्ही कसं पटवून द्याल की ते चुकीचे आहेत?” असा प्रश्न लाराला विचारण्यात आला. भारताकडून लारा दत्ता, व्हेनेझुएलाच्या क्लॉडिया मोरेनो आणि स्पेनच्या हेलन लिंडेस या तीन स्पर्धक फायनलमध्ये पोहोचल्या होत्या. या तिघींनाही परीक्षकांनी एकच प्रश्न विचारला होता.
‘टायगर इज बॅक…’, सलमान खानने ट्रोलर्सची बोलतीच बंद केली; भाईजानच्या बायसेप्सने वेधले लक्ष
तिघांनीही या प्रश्नाचं उत्तर दिलं, पण लाराच्या उत्तराने सर्व परिक्षकांचं मन जिंकलं. उत्तर देताना लारा म्हणाली की, “मला वाटतं की, ‘मिस युनिव्हर्स’सारख्या स्पर्धेमुळे आमच्यासारख्या तरुणींना ज्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जायचं आहे, मग ती उद्योजकता असो, सशस्त्र सेना असो किंवा राजकारण असो… त्यांना पुढे जाण्यासाठी व्यासपीठ मिळतं. हे व्यासपीठ आपल्याला आपलं मत मांडण्याची संधी देतं. आम्हाला आजच्यासारखं मजबूत आणि स्वतंत्र्य बनवतं…” तिच्या या उत्तराने तिने परीक्षकांची मनं जिंकली आणि मिस युनिव्हर्सचा ताज आपल्या नावे केला. लाराने आणि प्रियांकाने एकत्रित बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. लाराने आपल्या फिल्मी करियरमध्ये ‘नो एंट्री’, पार्टनर’, ‘मस्ती’, ‘भागम भाग’, ‘हाऊसफुल’, ‘चलो दिल्ली’ सारख्या अनेक सुपर डुपर हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा २००३ मध्ये पहिला चित्रपट रिलीज झाला.
सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर, ‘आलेच मी’ शानदार लावणी रिलीज
लाराने २००३ मध्ये अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’ चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. मुख्य गोष्ट म्हणजे, तिचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा हिट ठरला. त्यासोबतच, पहिल्या चित्रपटासाठी लाराला ‘सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणा’चा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. २०२० मध्ये लाराने डिस्नी हॉटस्टारवरील ‘हंड्रेड’ वेबसीरीजमधून पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर लारा ‘हिचकी और हुकअप’ चित्रपटात दिसली. तर लारा शेवटची ‘कौन बनेगा शिखरवती’ या वेबसीरीजमध्ये दिसली होती. जी जानेवारी २०२२ मध्ये Zee 5 या ओटीटीवर प्रदर्शित झाली होती. रणबीर कपूर आणि साई पल्लवी स्टारर ‘रामायण’ चित्रपटातूनही लारा दत्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती या चित्रपटात कैयकैयीच्या भूमिकेत दिसणार आहे.