(फोटो सौजन्य - अकाउंट)
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाने आता ओटीटीवरही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ११ एप्रिल रोजी ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. एकीकडे, लोक चित्रपटाच्या कथानकाचे आणि कथेच्या खोलीचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे, विकी कौशलच्या दमदार अभिनयाला राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यास पात्र म्हटले जात आहे. ओटीटीवर चित्रपट पाहून आता चाहते आपला भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
‘छावा’ने ओटीटीवरही दाखवली जादू
‘छावा’ या चित्रपटाने थिएटरमध्ये ५०० कोटींहून अधिक कमाई करून स्वतःला ब्लॉकबस्टर म्हणून सिद्ध केले आहे. पण ओटीटीवर आल्यानंतर, ज्या लोकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही त्यांना आता पश्चात्ताप होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “काश मी हा चित्रपट थिएटरमध्ये पहिला असता, विकी कौशलने केवळ अभिनय केला नाही तर ‘छावा’ही बनला आहे.” आता त्याला सर्वोत्तम अभिनेता चाहते म्हणत आहेत. त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.
लारा दत्ताने कसा जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा ताज ? ‘या’ उत्तराने अभिनेत्रीने जिंकले परिक्षकांचे मन
काय आहे चित्रपटाची कथा ?
चित्रपटाची कथा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित आहे, ज्यामध्ये देशभक्ती, युद्ध आणि बलिदानाच्या भावना दिसून येतात. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य कथेवर आधारित आहे. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे त्याचा अभिनय पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘खूप दिवसांनी इतका जबरदस्त अभिनय पाहायला मिळाला. विकी कौशल प्रत्येक दृश्यावर वर्चस्व गाजवतो. हा चित्रपट नाही, तर एक अनुभव आहे.’ असं लिहून अनेक चाहत्यांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे ए.आर. रहमानचा पार्श्वसंगीतही चित्रपटामध्ये आहे. क्लायमॅक्स दरम्यानचे संगीत इतके प्रभावी आहे की अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर रहमानच्या सर्वोत्तम रचनांमध्ये ते मोजण्यास सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनीही अक्षय खन्नाच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. लोकांना त्याची खलनायकासारखी शैली खूप आवडली आहे. अक्षय खन्नाने चित्रपटामध्ये औरंगजेबची भूमिका साकारली आहे.
विकीने राष्ट्रीय पुरस्कार हिसकावून घेतला का?
चित्रपटाची तुलना ‘पुष्पा’ चित्रपटाशी करताना एका वापरकर्त्याने म्हटले की, ‘विकी कौशलने पुष्पाकडून राष्ट्रीय पुरस्कार हिसकावून घेतला. हा चित्रपट केवळ इतिहासच सांगत नाही तर आजच्या तरुणांना संदेशही देतो. आपलेच लोक कधीकधी आपल्या देशाविरुद्ध कसे उभे राहतात.’ असं लोकांनी लिहिले आहे. चित्रपटाबद्दल बोलायचं झाला तर, या चित्रपटात रश्मिका मंदान्ना देखील आहे, जिने तिच्या भूमिकेने एक विशेष छाप सोडली. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपॅट’ हा किताब मिळण्याची चर्चा आता सुरू आहे.