
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेता धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. ज्यामुळे पूर्ण बॉलिवूड चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’ या अभिनेत्याचे अंत्यसंस्कार सोमवारी पवन हंस स्मशानभूमीत करण्यात आले, जिथे चित्रपट क्षेत्रातील मान्यवर अभिनेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचले. मंगळवारी सकाळी सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्रचा नातू करण देओल आजोबांच्या अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे.
अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलच्या AI व्हिडीओ ने वेधले लक्ष, चाहत्यांची वाढवली उत्सुकता
करण देओल अस्थिकलश घेऊन निघाला
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सनी देओलचा मुलगा अभिनेता करण देओल मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीतून त्याचे आजोबा, प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या अस्थिकलश घेऊन जाताना दिसला. करण देओल एका गाडीत बसलेला दिसतो आहे, त्याने लाल कपड्यात झाकलेला कलश धरला आहे. आजोबा गमावल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. देओल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
VIDEO | Actor Karan Deol, son of Sunny Deol, was seen carrying the ashes of his grandfather, veteran actor Dharmendra, from Mumbai’s Pawan Hans crematorium.#Dharmendra (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/BZgXdHdj25 — Press Trust of India (@PTI_News) November 25, 2025
१२ नोव्हेंबर रोजी अभिनेत्याला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
धर्मेंद्र यांच्यावर नुकतेच मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आहेत. अनेक दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, त्यांच्यासाठी त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी एक विशेष आयसीयू वॉर्ड तयार करण्यात आला, जिथे त्यांच्यावर डॉक्टर आणि चार परिचारिकांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. चाहत्यांना आशा होती की ही-मॅन बरा होईल आणि त्यांच्या आयुष्यात परत येईल, परंतु काल, २४ नोव्हेंबर रोजी त्यांचे मन दुखावले. अभिनेते धर्मेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला. आणि चाहत्यांना कायमचे अलविदा करून गेले आहेत.
‘दिल भी मेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून केले पदार्पण
धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला. धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देओल होते. त्यांच्या वडिलांचे नाव केवल कृष्णा आणि आईचे नाव सतवंत कौर होते. धर्मेंद्र यांनी त्यांचे सुरुवातीचे आयुष्य सानेहवाल गावात घालवले आणि एका सरकारी शाळेत शिक्षण घेतले. त्यांचे वडील या शाळेचे मुख्याध्यापक होते. धर्मेंद्र यांनी पंजाब विद्यापीठातून त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण केले. फिल्मफेअर मासिकाने एक नवीन प्रतिभा स्पर्धा आयोजित केली होती, ज्यामध्ये धर्मेंद्र विजयी झाले. त्यानंतर, ते अभिनय करण्याच्या इच्छेने मुंबईला गेले. धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी मेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ आहे, जो २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.