(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री गौतमी पाटील नुकतीच नवनवीन मराठी चित्रपटामध्ये दिसली आहे. याशिवाय टेलिव्हिजनवरही तिने विविध कार्यक्रमामध्ये तिचे अभिनयकौशल्य दाखवले आहे. तसेच गौतमीने नुकतीच एक गायक अभिजीत सावंत यांच्यासोबत एक फोटो शेअर केला होता. ज्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले, आणि या दोघांचा एकत्र प्रोजेक्ट येत असल्याचे त्यांनी अंदाज लावले. परंतु आता या दोघांचा AI व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये काही खास येत आहे असे गायक अभिजीत सावंतने लिहिले आहेत.
वयाच्या चाळीशीत संतोष जुवेकरला लग्न करण्याची घाई? लग्नाविषयी चाहत्यांना दिली मोठी हिंट
अभिजीत सावंत आणि गौतमीचा AI व्हिडीओ
निळशार समुद्र, नारळाच्या बागा आणि अभिजीत गौतमीचा एआय लूक मधला व्हिडिओ सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी ने अभिजीत सावंत सोबतचा एक सेल्फी सोशल मीडिया वर शेअर केला होता आणि कमिंग सून असं साजेस कॅप्शन देखील दिले होते. प्रेक्षकांनी हे दोघं सोबत नवीन प्रोजेक्ट करणार असल्याचा अंदाज लावला होता आणि आजच्या या व्हिडिओने त्यावर शिक्कमोर्तब केला आहे.
गायक अभिजीत सावंतने नवीन प्रोजेक्ट्स
2025 वर्ष गायक अभिजीत सावंतसाठी अगदीच खास असून या वर्षात त्याने अनेक ट्रेंडिंग गाणी केली. संगीत विश्वात 20 वर्ष पूर्ण करून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोहित केलं. कायम एव्हरग्रीन गायक असलेला अभिजीत पुन्हा एकदा चर्चेत आला आणि त्याने नुकतंच आतच्या तरुणाईसाठी मोहब्बत लुटाऊंगा या त्याचा सदाबहार गाण्याचं नवं कोर व्हर्जन देखील गायलं. अभिजीतने आजवर त्याचा आवाजाने आणि बिग बॉस मधल्या कमाल खेळीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे येणाऱ्या काळात देखील तो अनेक वैविध्यपूर्ण आणि कमाल प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे. इंडियन आयडॉल ते आजच्या पिढीला साजेशी ट्रेंडिंग गाणी देणारा तरुणाईचा लाडका गायक ठरला आहे.
Bigg Boss 19 : मालतीने तान्या मित्तलला मारली कानशिलात! म्हणाली – आणखी जोरात मारली…, पहा Video
गौतमी सोबत आता अभिजीत कोणतं नवीन गाणं करतोय ? हा प्रश्न प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असला तरी लवकरच याच उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे, अभिजितने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदची बातमी दिली आहे. दोघांच्या या AI व्हिडीओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चाहते कंमेंट करून त्यांचे कौतुक करत आहेत.






