(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपदेवर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप केला गेला होता. ज्यामुळे अभिनेत्यासह इतर १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण एका चिट फंड योजनेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये गावकऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अभिनेता श्रेयस तळपदेचे नावही डिफॉल्टर्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. असे म्हटले जाते की अभिनेता या कंपनीत प्रमोटर म्हणून काम करत होता. अभिनेता श्रेयस तळपदेला सर्वोच्च न्यायालयाकडून आता याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. एका सोसायटीविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने श्रेयस तळपदेचे नाव अडकले होते. आता अभिनेत्याला अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने हरियाणा पोलिसांना नोटीस बजावली
या प्रकरणाची सुनावणी करताना, न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने अभिनेत्याने दाखल केलेल्या याचिकेवर हरियाणा पोलिस आणि इतरांनाही नोटीस बजावली आहे. तसेच अभिनेत्याला आता या संपूर्ण प्रकरणाबाबत सुटका मिळाली आहे.
तळपदे आणि आलोक नाथ यांच्यासह १३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल
सोनीपतमधील एका सोसायटीविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताच्या तक्रारीवरून अभिनेता आणि ब्रँड ॲम्बेसेडर श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यासह १३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणात, सोनीपतच्या मुर्थलचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अजित सिंह यांनी सांगितले होते की ही तक्रार एका मल्टी-मार्केटिंग कंपनीविरुद्ध आहे ज्याची चौकशी सुरू आहे.
काय आहे हे संपूर्ण प्रकर?
खरं तर, एका सोसायटीने श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांना ब्रँड ॲबेसेडर म्हणून बोलावून चिट फंड योजना सुरू केली होती. ६ वर्षांत रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन ४५ लोकांकडून ९.१२ कोटी रुपये उकळल्याचा आरोप होता. एजंट म्हणून सामील झालेल्यांना व्यवस्थापकाचे पद देऊन इतर लोकांना जोडण्यासाठी ऑपरेटर्सनी प्रोत्साहित केले. कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्यानंतर, नोव्हेंबरमध्ये सोसायटीची कार्यालये अचानक बंद होऊ लागली. त्यानंतर पीडितांनी वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल केले. पण काहीही झाले नाही. अडचणीत आलेल्या गुंतवणूकदारांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर लखनऊच्या गोमतीनगर एक्सटेंशन पोलिस ठाण्यात चित्रपट अभिनेते आणि ऑपरेटरसह ७ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.