(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘The Paradise’ मधील नानीचा लूक चर्चेत
‘द पॅराडाईज’ चित्रपटातील स्टारकास्ट
‘द पॅराडाईज’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
नानीच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट “द पॅराडाईज” मधील त्याचा ‘जदाल’ या व्यक्तिरेखेमधील लूक प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये त्याची अनोखी शैली चाहत्यांनाही आश्चर्यचकित करत आहे. या चित्रपटातील त्याचा जबरदस्त लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच अभिनेत्याच्या या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. नानीचे चाहते त्याचा हा लूक पाहून कौतुक करत आहे. ‘द पॅराडाईज’ च्या नवीन पोस्टरवर चाहते कंमेंटचा वर्षाव करत आहेत.
धनुषसोबतच्या डेटिंग अफवांदरम्यान मृणालने अभिनेत्याच्या गाण्यावर केला डान्स, बहिणींनादेखील केले फॉलो
निर्मात्यांनी शेअर केले पोस्टर
‘द पॅराडाईज’ हा तेलुगू अॅक्शन थ्रिलर चित्रपट श्रीकांत ओडेला दिग्दर्शित करत आहेत, ज्यांनी यापूर्वी ‘दसरा’ चित्रपटात नानीसोबत काम केले आहे. ‘द पॅराडाईज’ चित्रपटात नानी ‘जदाल’ च्या भूमिकेत दिसणार आहे. आज, निर्मात्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर नानीचा एक जबरदस्त फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, ‘त्याचे नाव जदाल आहे… Calling a spade a spade #THEPARADISE’. असे लिहून निर्मात्यांनी हे पोस्टर शेअर केले आहे. चाहत्यांना हा पोस्टर खूपच आवडला आहे. अभिनेत्याचा डॅशिंग अंदाज यामध्ये दिसून येत आहे.
His Name/వాడి పేరు
‘Jadal’
‘జడల్’Calling a spade a spade. #THEPARADISE @odela_srikanth @anirudhofficial @SLVCinemasOffl @Dop_Sai @NavinNooli @artkolla @kabilanchelliah pic.twitter.com/gN3i0fPxv7
— Nani (@NameisNani) August 8, 2025
नानीच्या व्यक्तिरेखेतील जदालचा लूक आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया
या लूकमध्ये, नानीची जाड दाढी, लांब मिशा आणि दोन वेण्यांसह जबरदस्त शैलीत दिसत आहे, जी खूपच बोल्ड आणि वेगळी आहे. निर्मात्यांनी हे पात्र धाडसीपणे सादर केले आहे. डोळ्यांवर काळा चष्मा आणि गळ्यात काळे चांदीचे दागिने घातलेला नानीचा लूक चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. जदालच्या लूकमध्ये नानीला पाहिल्यानंतर चाहत्यांनीही त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘हा लूक कोणत्याही चित्रपटाने किंवा पात्राने प्रेरित आहे का?’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘जदाल… मला या लूकने आणि वेण्यांनी आश्चर्य वाटले…’, एका चाहत्याने लिहिले, ‘गँगस्टर ड्रामा…’. असे लिहून अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘द पॅराडाईज’ चित्रपटाबद्दल
नानी व्यतिरिक्त, जान्हवी कपूर देखील ‘द पॅराडाईज’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर मोहन बाबू आणि राघव जुयाल सहाय्यक भूमिका साकारणार आहे. ‘द पॅराडाईज’ हा चित्रपट १९८० च्या दशकातील सिकंदराबादच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, जो नेता शोधणाऱ्या एका उपेक्षित समुदायाची कथा सांगतो. हा चित्रपट २६ मार्च २०२६ रोजी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली, इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध यांनी दिले आहे. या चित्रपटाची निर्मिती एसएलव्ही सिनेमाजने केली आहे.