(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
पुन्हा एकदा स्वातंत्र्य क्रांतीची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कारण प्राइम व्हिडिओने त्यांच्या नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे. ‘द रेव्होल्यूशनरीज’ची पहिली झलक आज समोर आली आहे. यावरून असे दिसून येते की ओटीटी प्लॅटफॉर्म यावेळी एक नवीन कहाणी घेऊन येत आहे. या वेब सेरीजची छोटीशी झलक निर्मात्यांनी शेअर केली आहे. प्रेक्षकांना नक्कीच ही कथा आणि लेखन आवडेल अशी आशा आहे.
‘द रिव्होल्यूशनरीज’ ही देशातील तरुण क्रांतिकारकांची कथा
‘द रिव्होल्यूशनरीज’ ही मालिका संजीव सान्याल यांच्या ‘रिव्होल्यूशनरीज: द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया गॉट इट्स फ्रीडम’ या पुस्तकावर आधारित आहे. या मालिकेची कथा त्या धाडसी तरुण भारतीय क्रांतिकारकांची आहे ज्यांना ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी सशस्त्र संघर्ष आवश्यक आहे असे वाटत होते. ‘द रिव्होल्यूशनरीज’ त्यांचे जीवन, त्याग आणि देशाप्रती असलेले त्यांचे समर्पण दाखवते. ही मालिका मुंबई, अमृतसर, वाराणसी, डेहराडून आणि इतर शहरांमध्ये चित्रित केली जात आहे. ‘द रिव्होल्यूशनरीज’ पुढील वर्षी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘Sardaar Ji 3’ वादानंतर पहिल्यांदाच मीडिया समोर आला दिलजीत, हात जोडून मानले आभार
निखिल अडवाणी यांनी ही मालिका दिग्दर्शित केली आहे. निखिल अडवाणी दिग्दर्शित या मालिकेत भुवन बाम, रोहित सराफ, प्रतिभा रणता, गुरफतेह पिराजादा आणि जेसन शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ही वेबसिरीज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मराठी माणूस ‘शिव ठाकरे’ने लाडक्या आजीला घडवली दुबईची सफर, फोटो पाहून चाहते भावुक
भुवन बाम वेगळ्या शैलीत दिसेल
भूवन बाम, रोहित सराफ आणि प्रतिभा रणता हे मालिकेत वेगळ्या शैलीत दिसणार आहेत, जे त्यांच्या चाहत्यांना रोमांचित करत आहे. या तिन्ही कलाकारांनी यापूर्वी अशी भूमिका साकारलेली नाही. रोहित सराफ ‘मिसमॅच’ चित्रपटातील लव्हर बॉयच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध आहे. प्रतिभा रांताने ‘लापता लेडीज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटात ती एका गावातील मुलीच्या वेगळ्या भूमिकेत दिसली होती. तर भुवन बाम हा एक प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता आहे. तो ‘ताजा खबर’ आणि ‘धिंडोरा’ सारख्या वेब सिरीजसाठी ओळखला जातो.