'बिग बॉस' मराठी आणि हिंदी मध्ये नावाजलेला अभिनेता शिव ठाकरे सध्या चर्चेत आहे. तसेच या अभिनेत्याने नुकतीच दुबई सफर केली आहे. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो तो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असतो. तसेच शिव नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि चाहत्यांना वैयक्तिक आयुष्यातील घडामोड शेअर करत असतो. दरम्यान दुबईची सफर करताना त्याच्यासोबत त्याचे आई - बाबा आणि आजी देखील दिसत आहेत. त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.
मराठी माणूस 'शिव ठाकरे'ने लाडक्या आजीला घडवली दुबईची सफर, फोटो पाहून चाहते भावुक (फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
शिव दुबईची सफर गर्लफ्रेंड किंवा मित्रांसोबत नाही तर कुटूंबासोबत करताना दिसला आहे. मराठमोळ्या शिव ठाकरेचं चाहते आता कौतुक करत आहेत. त्याच्या आजीसोबतचे फोटो चर्चेत आहेत.
शिव ठाकरे नुकताच दुबईत फिरताना मज्जा करताना दिसला आहे. शिवनं थेट आजीला आणि आई वडिलांना दुबईत नेलं. आणि तेथील सगळ्या आठवणी त्याने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
मराठी माणूस 'शिव ठाकरे'ने लाडक्या आजीला घडवली दुबईची सफर, फोटो पाहून चाहते भावुक (फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
आजी आणि आई-बाबांसोबत त्याने दुबईच्या वाळवंटाची सफर केली. शिवच्या आजीचे फोटो चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरले आहेत. आजीने नऊवारी साडीत दुबईला हजेरी लागली.
शिवनं आजीला उचलून घेतलेला एक फोटो शेअर केला आहे. जो चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. त्याने काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. आजी आणि आईचा स्वॅग चाहत्यांना आवडला आहे.