Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fussclass Dabhade: लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटामधील ‘दिस सरले’ गाणं प्रदर्शित!

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार असून, प्रेक्षकांसाठी लवकरच नवा चित्रपट 'फसक्लास दाभाडे’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच 'दिस सरले' गाणं रिलीज झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 02, 2025 | 11:31 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. ज्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना आणि टीझरला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ‘यल्लो यल्लो’ गाण्यावर दाभाडे कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला असून हे गाणं सोशल मीडियावर, लग्नात प्रचंड गाजत आहे. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, आणि राजसी भावे यांच्या प्रमुख पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘फसक्लास दाभाडे’ मधील नुकतेच लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारे ‘दिस सरले’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात लग्नातील प्रत्येक भावनिक क्षणांचा एक सुंदर कोलाज पाहायला मिळत आहे. रुखवत तयार करण्यापासून नवरीच्या पाठवणीपर्यंत प्रत्येक प्रसंग या गाण्यात उत्कृष्टपणे मांडला असून प्रत्येकाच्या मनातील भावना आणि लग्नातील हास्यविनोद दिसत आहे. विशेष म्हणजे यात मिताली मयेकर दिसत असून या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. यात नेमकं त्यांचे नातं काय असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर हे गाणं हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे.

 

निर्माते भूषण कुमार म्हणतात,” ‘दिस सरले’ हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे. लग्नातील भावनिक क्षण आणि हास्यविनोदाची गुंफण या गाण्यात उत्तमरित्या मांडली गेली असून हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातील खास आठवणींशी नक्कीचं जोडेल, याची आम्हाला खात्री आहे.’’ असे त्यांनी सांगितले. तसेच चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय म्हणतात, “लग्नातील रुखवतापासून पाठवणीपर्यंतचा प्रत्येक क्षण ‘दिस सरले’ या गाण्यात प्रभावीपणे मांडला गेला आहे. लग्नासारख्या उत्सवातील आनंद आणि भावनांचा हा अनोखा संगम रसिकांच्या हृदयाला नक्कीच भिडेल”. असे ते म्हणाले आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे म्हणाले की, ‘लग्न हे दोन जीवांच्या एकत्र येण्याचा सोहळा असतो जो एक अत्यंत भावनिक अनुभव असतो, प्रत्येक कुटुंबासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो. या गाण्याच्या निमित्ताने प्रत्येक लग्नासाठी एक वैश्विक भावना तयार करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. मला खात्री आहे लग्नं झालेल्या आणि होऊ घातलेल्या प्रत्येकाला हे गाणं आपलंसं वाटणार आहे.’ असे हेमंत ढोमे यांनी सांगितले.

“बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान” चित्रपटाचे पोस्टर लाँच; अभिनेता चंदन रॉय सन्याल मुख्य भूमिकेत!

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून, चाहत्यांना चित्रपटाचा अनुभव घेता येणार आहे.

Web Title: The song dis sarle from the movie fussclass dabhade which brings back memories of a wedding has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Amey Wagh
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज
1

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज

“कुर्ला टू वेंगुर्ला”मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’, वीणा जामकर – वैभव मांगले प्रमुख भूमिकेत
2

“कुर्ला टू वेंगुर्ला”मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’, वीणा जामकर – वैभव मांगले प्रमुख भूमिकेत

प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची अद्भुत कहाणी, ‘असंभव’चा फर्स्ट लूक रिलीज
3

प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची अद्भुत कहाणी, ‘असंभव’चा फर्स्ट लूक रिलीज

हागवणेंनी चित्रपट क्षेत्रातही लावला पैसा, दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंनी फसवलं; उपमुख्यमंत्रयांच्या हस्ते पोस्टर लाँच
4

हागवणेंनी चित्रपट क्षेत्रातही लावला पैसा, दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंनी फसवलं; उपमुख्यमंत्रयांच्या हस्ते पोस्टर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.