Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सचिन पिळगांवकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच!

सहकुटुंब पाहता येणाऱ्या "मुक्काम पोस्ट देवाचं घर" चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. उत्तम कथानकाला रंजकतेची जोड असलेला हा चित्रपट आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 18, 2025 | 01:31 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून उपस्थित होते. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

लहान मुलांच्या भावविश्वात खूप काही सुरू आहे. मुलांना अनेक प्रश्न त्यांच्या लहान वयात पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मुलं आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करतात. “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो. त्याबरोबरच तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून दिसून येत आहे. त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या कथानकाची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या, रंजक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरमधून समजतं आहे. श्रवणीय संगीताचीही जोड या कथानकाला असून “सुंदर परिवानी” या गोड़ गीताला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

सैफ अली खाननंतर ‘या’ ८ सेलिब्रेटींचा जीव धोक्यात? सरकारकडून मिळतेय X, Y आणि Z सिक्युरिटी

एखादी चांगली कलाकृती तुम्ही केल्यावर नक्कीच त्यामागे अनेकजण पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्याचप्रमाणेच मंगेश ही या कलाकृतीच्या मागे प्रस्तुतकर्ता म्हणून उभे राहिले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर मला खुप आवडला आहे. दिग्दर्शक संकेतने या चित्रपटाची मांडणी उत्तम केली असल्याचे ट्रेलर मधून दिसून येते आहे. मायराने या चित्रपटात साकारलेली प्रमुख भूमिका उल्लेखनीय असल्याचे ट्रेलर मधून जाणवते आहे. ‘तिने यात सातत्य ठेऊन अनेक उत्तम भूमिका साकारुन मनोरंजन विश्वात अजुन नाव कामवावे यासाठी माझे तिला अनेक आशीर्वाद असल्याचे सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.’

 

मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. कीमाया प्रॉडक्शनचे महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते असून त्यांची ही पहिलीच निर्मिति आहे. तर, वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन केले आहे. या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार यांच्या मध्यवर्ती भूमिका प्रेक्षकांना चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे.

Bigg Boss 18 च्या टॉप 6 स्पर्धकांच्या सपोर्ट करणाऱ्या सेलिब्रेटींचा सामना होणार मीडियाशी! एल्विश यादवची मीडियाशी बाचाबाची

अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचे छायाचित्रण रोहन मडकईकर यांनी केले असून गीतकार मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीताना चिनार महेश यांचे श्रवणीय संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर याचे असून कार्यकारी निर्माता म्हणून अतुल साळवे यांनी काम पाहिले आहे. तर असा हा सहकुटुंब पाहता येणारा चित्रपट येत्या ३१ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ज्याचा आनंद तुम्हाला अनुभवयाला मिळणार आहे.

Web Title: The trailer launch of the film mukkam post devache ghar was held in the presence of sachin pilgaonkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • sachin pilgaonkar

संबंधित बातम्या

निष्ठावान शिष्य आणि सक्षम गुरुची गोष्ट सांगणाऱ्या ‘फकिरीयत’चा ट्रेलर लाँच, चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
1

निष्ठावान शिष्य आणि सक्षम गुरुची गोष्ट सांगणाऱ्या ‘फकिरीयत’चा ट्रेलर लाँच, चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

‘परम सुंदरी’सोबत ‘हे’ ८ आगामी चित्रपट कोणत्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित? मॅडॉक फिल्म्सने घेतला मोठा निर्णय
2

‘परम सुंदरी’सोबत ‘हे’ ८ आगामी चित्रपट कोणत्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित? मॅडॉक फिल्म्सने घेतला मोठा निर्णय

हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी येणार टीझर
3

हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी येणार टीझर

‘Bigg Boss 19’ या दिवशी होणार सुरु, सलमान खानने कुटुंबासह पाहण्याचे केले आवाहन
4

‘Bigg Boss 19’ या दिवशी होणार सुरु, सलमान खानने कुटुंबासह पाहण्याचे केले आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.