
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आज बहुप्रतिक्षित ‘बिंदिया के बाहुबली सीझन 2’ चा ट्रेलर प्रदर्शित केला गेला. ट्रेलरमध्ये चक्रम दावन कुटुंबातील बदलत्या शक्तीचे समीकरण तसेच वाढत्या अशांततेची झलक पाहायला मिळते.पहिल्या सीझनमध्ये जिथे कथानक थांबले होते, दुसऱ्या सीझनमध्ये कथा तिथूनच सुरू होते. तुरुंगात असलेला बडा दावन प्रतिस्पर्ध्यांशी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्याचा मुलगा छोटे दावन आपल्या पुरुषसत्ताक गादीवर नियंत्रण मिळवण्याचे स्वप्न पाहतो.
सत्तेचे खेळ, विश्वासघात, कौटुंबिक उलथापालथी यामुळे प्रेक्षक कुटुंब, राजकारण आणि महत्वाकांक्षा यांच्या गुंतागुंतीत सहज हरवून जातात. चक्रम या नाटकात घडामोडींवर ताबा नसल्यामुळे मनोरंजनाची भरपूर मात्रा अनुभवता येते.
बिंदिया के बाहुबली सीझन 2 मध्ये सौरभ शुक्ला, रणवीर शौरी, दिव्येंदु भट्टाचार्य, सीमा बिस्वास, सुशांत सिंग, शीबा चड्ढा, सई ताम्हणकर, तनिष्ठा चॅटर्जी, विनीत कुमार आणि आकाश दहिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हा नवीन ट्रेलर बिंदियामधील तणाव वाढवण्यात वेळ वाया घालवत नाही. तो दावन कुटुंबातील समीकरणांमध्ये बदल होत असल्याचे संकेत देतो. मोठा दावन (सौरभ शुक्ला)च्या जागेवर बसलेला छोटा दावन नेतृत्वाच्या अगदी वेगळ्या कल्पनेसह साम्राज्य स्वत:च्या मार्गाने चालवण्याचा प्रयत्न करतो. परिणामी आजवर कुटुंबात असलेला गोंधळ रस्त्यांवर येतो. सर्वात मोठा धोका बाहेरील शत्रू नसून आतली महत्त्वाकांक्षा असल्याची जाणीव दावनना होत असल्याने, या ट्रेलरमध्ये कृतीपूर्ण संघर्ष, बदलती निष्ठा आणि सर्वसमावेशक युद्धाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहराची खिल्ली उडवली आहे.
सिरीजच्या पुनरागमनाबद्दल बोलताना, अॅमेझॉन एमएक्स प्लेयर’चे डायरेक्टर आणि हेड ऑफ कंटेंट अमोघ दुसाद म्हणाले, “आम्ही अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर, पूर्णपणे मनोरंजक तसेच मूळ आणि समर्पक कथा सांगण्याचा प्रयत्न करतो. ‘बिंदिया के बाहुबली’ ही एक आगळीवेगळी मालिका आहे. ज्यात गुन्हेगारी आणि कौटुंबिक संघर्ष यांचा अतिशय अस्सल पद्धतीने मेळ घातला आहे. नवीन आव्हाने आणि बदलत्या नातेसंबंधांसह सीझन 2 या जगाला पुढे घेऊन जातो. सिरीजमधील विनोद, विचित्र पात्रे आणि छोट्या शहरातील बडबड्या व्यक्तिरेखांच्या यांचे मिश्रण दोन्ही सीझनना साजेसे आहे. परंतु यावेळी जमवून आणलेली भट्टी अफलातून आहे. हा पुढचा अध्याय प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
बडा दावनची भूमिका पुन्हा एकदा साकारताना सौरभ शुक्ला यांनी सांगितले की, “हे कथानक प्रेक्षक पसंतीचे ठरले कारण या सगळ्या गोंधळातला भावनिक प्रामाणिकपणा! ही पात्रे सदोष, शक्तिशाली आणि सखोल मानवी आहेत. सीझन 2 कुटुंबातील रस्सीखेच वाढवतो, नवीन संघर्ष, विनोद आणि अनपेक्षित वळणांमुळे प्रत्येकाला स्वत:च्या मर्यादेपर्यंत ढकलते.”
छोटे दावन ही व्यक्तिरेखा पुन्हा एकदा उभी करणारा रणवीर शौरी पुढे म्हणाला, “‘बिंदिया के बाहुबली’ला गोंधळ आणि विनोद यांच्यातील संतुलन मनोरंजक बनवते. सत्तेमुळे शेवटी आपल्याला आदर मिळेल असा विश्वास छोट्या दावनला आहे. मात्र आपण टाकलेले प्रत्येक पाऊल आपल्यापासून काहीतरी हिसकावून नेते हे ते त्याला दिसत नाही. महत्त्वाकांक्षा अनियंत्रित झाल्यावर राक्षसी कशी बनते हे सूत्र सीझन 2 ने नेमके पकडले आहे. हा ट्रेलर त्या मनःस्थितीला चांगल्या प्रकारे कैद करतो आणि मला वाटते की या सीझनमध्ये कौटुंबिक आराखडे कसे विकसीत होतात हे पाहणे प्रेक्षकांना आवडेल .”
बिंदिया के बाहुबली सीझन 2 चे विनामूल्य स्ट्रीमिंग दिनांक 21 जानेवारी 2026 पासून होईल. ते केवळ मोबाइल आणि कनेक्टेड टीव्हीवरील अॅमेझॉन एमएक्स प्लेयर, एमएक्स प्लेयर अॅप, अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि एअरटेल एक्सट्रीमवर उपलब्ध असेल.
सिद्धू मूसेवालानंतर आता B Praak? गायक बी-प्राकला लॉरेन्स बिश्नोई गँग कडून धमकी; १० कोटीं द्या नाहीतर