आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर पंजाबचे प्रसिद्ध गायक बी-प्राक (B Praak)असल्याची माहिती समोर येत आहे. बी-प्राक यांचा जवळचा मित्र आणि गायक दिलनूर (Dilnoor) याला धमकीचा फोन आला आहे. एवढेच नाही तर १० कोटींची खंडणी देखील मागितली आहे. जर १० कोटी दिले नाही तर बी-प्राकला नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली आहे.
काय नेमकं प्रकरण?
पंजाबी गायक दिलनूर यांना ५ जानेवारी रोजी परदेशी नंबरवरून धमकीचा फोन आला होता. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. ६ जानेवारी रोजी एका वेगळ्या परदेशी नंबरवरून फोन आला. तो फोन उचलल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा आवाज संशयास्पद वाटल्याने दिलनूर यांनी तात्काळ कॉल कट केला.फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव आरजू बिश्नोई असल्याचे सांगितले.
फोन कट करताच त्यांना एक व्हॉइस मेसेज आला. हा मेसेज धमकीचा होता. या ऑडिओ मेसेजमध्ये कॉल करणाऱ्याने एका आठवड्यात १० कोटी रुपयांची मागणी केली असून, अन्यथा बी-प्राक यांना नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार घडताच दिलनूर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणात काय महत्वाचे उपडेट समोर येतात, पोलीस कारवाई काय करणार? हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बी-प्राक हे अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित
बी-प्राक हे प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार असून त्यांनी पंजाबी सिनेसृष्टीसोबतच हिंदी संगीतसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘मन भरया’ हे त्यांचे पहिले गाणे आजही चाहत्यांचे आवडते आहे. आपल्या उत्कृष्ट गायन कारकिर्दीसाठी बी-प्राक यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.
Ans: बी-प्राकचे जवळचे मित्र व गायक दिलनूर यांना.
Ans: १० कोटी रुपयांची.
Ans: तक्रारीनंतर प्रकरणाचा तपास सुरू आहे.






