(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
आज ८ जानेवारीला दक्षिणेतील अभिनेता यश त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. KGF 1 आणि KGF 2 मध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणाऱ्या यशच्या आगामी ॲक्शन चित्रपट टॉक्सिकचा टीझर समोर आला आहे. चाहते या टीझरची अनेक काळापासून प्रतीक्षा करत होते. त्यांची ही प्रतीक्षा संपली अजून आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे टीझर रिलीज करण्यात आले आहे. आज चाहत्यांसह कलाकारही अभिनेत्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत.
केव्हीएन प्रॉडक्शनने काही काळापूर्वी टॉक्सिक चित्रपटाचा म्युझिकल टीझर रिलीज केला आहे. चित्रपट निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये यशच्या चित्रपटातील लूकचे पोस्टर दिसत आहे. या पोस्टरचा लूक लाल आहे, ज्यामध्ये यश कॅप घातलेला दिसत आहे. या लूकसोबतच निर्मात्यांनी लिहिले, ‘तुमच अदम्य दुनियेत स्वागत आहे #टॉक्सिकदमूवी..’ यासोबतच त्यांनी टॉक्सिक चित्रपटाच्या म्युझिकल टीझरची यूट्यूब लिंकही दिली आहे. हा टीझर पाहून आता चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
Ajit Kumar Accident : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा भीषण अपघात; दुर्घटनेचा Video Viral
निर्मात्यांनी टीझर रिलीज करण्याचे आश्वासन दिले होते
टॉक्सिकचा टीझर रिलीज होण्यापूर्वी यशचा आणखी एक लूक समोर आला होता, ज्यामध्ये तो कॅप घातलेला दिसत होता. संपूर्ण चित्र लाल रंगात दिसले. यशच्या वाढदिवसाला 10.25 वाजता टॉक्सिक या चित्रपटाबाबत काहीतरी खास येणार असल्याचेही निर्मात्यांनी या पोस्टर मध्ये सांगितले होता. वचन दिल्याप्रमाणे, चित्रपट निर्मात्यांनी टॉक्सिकचा म्युझिकल टीझर रिलीज केला आहे. जो पाहून चाहत्यांना आता आनंद झाला आहे.
‘बेबी जॉन’ च्या अपयशानंतरही वरुणने खरेदी केले आलिशान घर; जाणून घेऊयात नवीन अपार्टमेंटची किंमत?
KGF आणि KGF 2 नंतर यश टॉक्सिक या चित्रपटात दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्री टॉक्सिकमध्ये दिसणार आहेत. टॉक्सिक हा हाय ऑक्टेन गँगस्टर ड्रामा चित्रपट मोठ्या प्रमाणावर बनवला जात आहे. जो सिनेमागृहात नक्कीच ब्लॉकब्लस्टर होईल याची खात्री आहे.