(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलीवूड स्टार वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल हे मुंबईतील प्रमुख जुहू परिसरात त्यांच्या नवीन रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आहेत. या दाम्पत्याने नुकतेच डी डेकोर ट्वेंटी इमारतीत एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याची किंमत करोडोंमध्ये आहे. अभिनेत्याचा नुकताच ‘बेबी जॉन’ हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी सिनेमागृहात चांगला प्रतिसाद दिला नाही आहे. असे अजूनही आता अभिनेत्याने नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे. ज्यामुळे तो आता चर्चेत आला आहे.
सातव्या मजल्यावर आलिशान घर आहे
अभिनेत्याने खरेदी केले घर हे सध्या चर्चेत आहे. हे अपार्टमेंट 5,112 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे आणि इमारतीच्या सातव्या मजल्यावर आहे. नोंदणीच्या तपशिलानुसार, ही मालमत्ता ३ जानेवारी २०२५ रोजी अंतिम करण्यात आली. यामध्ये 2 कोटी 67 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरण्यात आले आहेत. अभिनेता वरून आणि त्याची पत्नी नताशा दलाल दोघांनी मिळून आलिशान घरात करोडोंची गुंतवणूक केली आहे.
ही अपार्टमेंटची किंमत आहे
वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या या अपार्टमेंटमध्ये चार कार पार्किंग स्पेसही आहेत, ज्यामुळे या घराची लक्झरी मध्ये आणखी वाढ झालेली आहे. या खरेदीची प्रति चौरस फूट किंमत 87,089 रुपये आहे. घराची किंमत 44.52 कोटी रुपये आहे. जुहू परिसर आपल्या आलिशान जीवनशैली आणि चित्रपट व्यक्तिमत्त्वांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक कलाकारांची घरे आहेत.
अनेक स्टार्स जुहूमध्ये राहतात
जुहू आणि वांद्रे हे मुंबईचे मुख्य क्षेत्र आहेत, जिथे अनेक बॉलिवूड स्टार राहतात. अमिताभ बच्चन यांचे जुहूमध्ये ‘प्रतिष्ठा’ आणि ‘जलसा’सारखे आलिशान बंगले आहेत. याशिवाय धर्मेंद्र, हेमा मालिनी, अक्षय कुमार, अजय देवगण, काजोल, गोविंदा आणि संजय लीला भन्साळी हे देखील जुहू परिसरात राहतात. त्याचबरोबर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सैफ अली खान आणि करीना कपूरसह अनेक स्टार्स वांद्रे परिसरात राहतात.
Ajit Kumar Accident : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा भीषण अपघात; दुर्घटनेचा Video Viral
या चित्रपटांमध्ये दिसणार अभिनेता
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच वरुण धवन ‘बेबी जॉन’ या चित्रपटात कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव यांच्यासोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर, तो ‘नो एन्ट्री 2’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूर यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय वरुण धवनकडे ‘बॉर्डर 2’ हा चित्रपटही आहे. या चित्रपटात तो सनी देओल, दिलजीत आणि अहान शेट्टीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.