Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला “चिडिया” या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर लाँच, जाणून घ्या कधी होणार चित्रपट रिलीज!

आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला हिंदी चित्रपट "चिडिया" हा लवकरच सिनेमागृहात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच या चित्रपटाची स्टारकास्ट देखील धमाकेदार असून, या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 21, 2025 | 11:41 AM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला “चिडिया” हा चित्रपट येत्या ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटातून एक हृदयस्पर्शी गोष्ट आपल्याला पहायला मिळणार आहे. अमृता सुभाष, विनय पाठक, श्रेयस तळपदे, ब्रिजेश कालरा, इनामूल हक अशा मातब्बर कलाकारांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

की मीडिया वर्क्स, निर्मित या संस्थेअंतर्गत चिडिया या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर मेहरान अमरोही यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात विनय पाठक अमृता सुभाष, श्रेयस तळपदे, इनामूल हक, ब्रिजेंद्र काळा यांच्या भूमिका पाहायला मिळणार असून, उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहे. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, कलादिग्दर्शन प्रितेश खुशवाह यांचे आहे, तर वितरण रिलायन्स एंटरटेनमेंट करत आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड सिंगरने गाण्याची ऑफर धुडकावली, ५० लाखांची ऑफर नाकारण्याचं नेमकं कारण काय?

मुंबईतील चाळीतील घरात राहणाऱ्या शानू आणि बुआ या दोन उत्साही भावांची हृदयस्पर्शी गोष्ट या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. केवळ कल्पनाशक्ती, आशा, त्यांची आई आणि समाजातील लोकांच्या मदतीने ते त्यांच्या परिस्थितीपेक्षा खूप मोठ्या स्वप्नाचा पाठलाग कसा करतात? मुले त्यांची स्वप्ने जिवंत ठेवण्यासाठी ज्या अदृश्य लढाया लढतात त्याची एक रंजक गोष्ट या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. ही कथा नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष वेधणार आहे.

 

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मेहरान अमरोही म्हणाले की, “चिडिया हे बालपणाला लिहिलेल प्रेमपत्र आहे. हा चित्रपट उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहणाऱ्या लोकांबद्दल आहे जी स्वप्न कधीही जुनी होत नाही. यासगळ्याची हा चित्रपट शांतपणे आठवण करून देतो. या चित्रपटात अभिनेते विनय पाठक, अभिनेत्री अमृता सुभाष, इनामुलहक, ब्रिजेंद्र कला आणि उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, कलादिग्दर्शन प्रितेश खुशवाह यांचे आहे तर वितरण रिलायन्स एंटरटेनमेंटने करणार आहे.

एकेकाळी ९४ किलो वजन ज्युनियर NTR ला विद्रुप म्हटले जायचे, पण राजामौलीने आयुष्य बदललं

जवळजवळ एक दशकापूर्वी पूर्ण झालेला, ‘चिडिया’ चित्रपटाने आधीच जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली आहे, चेक रिपब्लिक (झ्लिन आयएफएफ), द नेदरलँड्स (सिनीकिड), द यूएसए (एसएआयएफएफ), रशिया (स्पिरिट ऑफ फायर आयएफएफ), इराण (मुलांसाठी आणि प्रौढांसाठी आयएफएफ) आणि त्यापलीकडे असलेल्या महोत्सवांमध्ये मने जिंकली आहेत. या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले अजून, आता सिनेमागृहात येण्यासाठी सज्ज झाला आहे. “चिडिया” येत्या २३ मे २०२५ पासून संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Trailer launch of hindi film chidiya which won an international award will be released on may 30th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द
2

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली
3

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
4

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.