टॉलिवूड सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) फक्त भारतातच नाही तर, जगभरात आजच्या घडीला तो लोकप्रिय आहे. एनटीआरचे केवळ देशातच नाही तर जगभरात फॅन फॉलोअर्स आहेत. ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव नंदमुरी तारक रामाराव ज्युनिअर असं आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर साऊथ सुपरस्टारने प्रेक्षकांची मने जिंकली.
टॉलिवूड सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) फक्त भारतातच नाही तर, जगभरात आजच्या घडीला तो लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्ग टॉलिवूडमध्येच नाही तर, संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव नंदमुरी तारक रामाराव ज्युनिअर असं आहे. अशा या बहुआयामी कलाकाराचा आज ४२ वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म २० मे १९८३ रोजी हैदराबादमध्ये झाला. ज्युनिअर एनटीआरचा जन्म एका रॉयल घराण्यात झाला असला तरी सिनेसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे. आयुष्यात एकेकाळी त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड सिंगरने गाण्याची ऑफर धुडकावली, ५० लाखांची ऑफर नाकारण्याचं नेमकं कारण काय?
एकेकाळी ९४ किलो वजन असणाऱ्या एनटीआरला लठ्ठ आणि विद्रुप म्हणत नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जायचे. पण आज तो इतका फिट आहे की, त्याची गणना सर्वात योग्य तेलुगू अभिनेत्यांमध्ये केली जाते. दरम्यान, ज्युनियर एनटीआरने ‘लोक परलोक’पासून ‘आरआरआर’पर्यंत अनेक चित्रपटांसाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. आपल्या फिल्मी करियरमध्ये एनटीआरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यु. एनटीआर लवकरच हृतिक रोशन स्टारर ‘वॉर २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. हृतिक रोशन एनटीआरच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना स्पेशल गिफ्ट देणार आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती
ज्येष्ठ तेलुगू अभिनेते, चित्रपट निर्माते आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रावाराव यांचा ज्युनियर एनटीआर नातू आहे. तर, चित्रपट अभिनेता आणि राजकारणी नंदमुरी हरिकृष्णा यांचा तो मुलगा आहे. अभिनेत्याला चाहते प्रेमाने तारक म्हणतात. ज्युनिअर एनटीआरने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या ८ व्या वर्षी केली आहे. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मऋषी विश्वमित्र’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यावर्षी एनटीआर ८ वर्षांचाच होता. अभिनेत्याने आजोबांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात राजा भरतची भूमिका साकारली होती. पुढे वयाच्या १४ व्या वर्षी एनटीआर श्रीरामाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला आला होता. १९९७ साली रिलीज झालेल्या ‘रामायणम्’ चित्रपटात त्याने हे काम केलं होतं. या चित्रपटातील कामासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
एक गाडी, पैशांनी भरलेली बॅग आणि अनेक रहस्य, ‘गाडी नंबर १७६०’चा होणार लवकरच खुलासा
ज्युनिअर एनटीआरला वयाच्या १८ व्या वर्षी २००१ मध्ये ‘निन्नु चूडालानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पहिला ब्रेक मिळाला. शाळा आणि कॉलेजमध्ये शिकत असताना ज्युनियर एनटीआरने कुचीपुडी नृत्याचे प्रशिक्षणही घेतले होते. २००१ साली रिलीज झालेला ‘स्टुडंट नंबर १’ हा ज्युनियर एनटीआरचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला सुपरहिट चित्रपट होता. एस.एस. राजामौली यांचा हा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणारा पहिला चित्रपट होता. ज्युनियर एनटीआरने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत राजामौलीसोबत ‘सिम्हाद्री’, ‘लोक-परलोक’ आणि ‘आरआरआर’सह बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते.
ज्युनिअर एनटीआरने जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअरला सुरुवात केली, तेव्हा लठ्ठपणा आणि दिसण्यावरुन कुरुप म्हणून त्याची अवहेलना करण्यात आली होती. त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ‘राखी’ या २००६ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटासाठी त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. त्यावेळी त्याचं वजन १०० किलो होतं. पुढे २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘लोक परलोक’ चित्रपटासाठी त्याने २० किलो वजन कमी केलं होतं.