फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 नॉमिनेशन : लोकप्रिय टेलिव्हिजन शो बिग बॉस 18 फिनालेच्या दिशेकडे वाटचाल करत आहे. शोमध्ये येणारे ट्विस्ट प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहेत. वीकेंडच्या वॉरवर, सलमान खान शोच्या चाहत्यांचे मनोरंजन करतो आणि कुटुंबातील सदस्यांची शाळा घेताना दिसला. आगामी भागामध्ये आता स्पर्धक एकमेकांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता, या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांची यादीही समोर आली आहे. या आठवड्यात कोणते सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत यावर एकदा नजर टाका.
कालच्या भागानंतर एक प्रोमो व्हायरल होत आहे यामध्ये आगामी भागामध्ये नॉमिनेशन होणार आहे हे स्पष्ट सांगण्यात आले आहे. या आठवड्यात बिग बॉस 18 मध्ये नॉमिनेट स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर यावेळी सात जणांची नावे समोर आली आहेत. या यादीत ईशा सिंह, चाहत पांडे, राजच दलाल, कशिश कपूर, अविनाश मिश्रा, विवियन डिसेना आणि श्रुतिका अर्जुन यांच्या नावांचा समावेश आहे. आता प्रश्न असा आहे की, यावेळी या सातपैकी कोण या आठवड्यामध्ये घराबाहेर होणार?
उल्लेखनीय आहे की, अलीकडेच सारा अफरीन खानला शोमधून काढून टाकण्यात आले आहे. आता सारानंतर ईशा सिंग आणि कशिश कपूर यांना या आठवड्यात सर्वात कमी मते मिळाली आहेत. एवढेच नाही तर या आठवड्यात श्रुतिका अर्जुनही नॉमिनेट झाली आहे. अशा स्थितीत आता या तिघीनाच सर्वात कमी मते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कशिशही या यादीत टॉपवर असू शकते आणि पण तरीही तिला शोमधून बाहेर काढले जाऊ शकते. कारण कशिशचा खेळ लोकांना फारसा काही आवडला नाही.
🚨 Nominated Contestants for this week
☆ Eisha Singh
☆ Chahat Pandey
☆ Rajat Dalal
☆ Kashish Kapoor
☆ Avinash Mishra
☆ Vivian Dsena
☆ Shrutika ArjunComments – Who will EVICT?
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 29, 2024
बिग बॉसचा फिनाले आता फार दूर नाही हे विशेष. अशा परिस्थितीत शोचा प्रत्येक स्पर्धक मोठ्या उत्साहाने पुढे जात आहे. अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकजण आपली पावले अत्यंत काळजीपूर्वक घेत आहे आणि स्पर्धकाची एक चूक त्यांना घरातून बाहेर काढू शकते. अशा परिस्थितीत, घरात उपस्थित असलेल्या प्रत्येक स्पर्धकाने हा खेळ काळजीपूर्वक खेळणे फार महत्वाचे आहे.
यासोबतच बिग बॉसच्या फिनालेबद्दल बोलायचे झाले तर, शोचा फिनाले पुढच्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये १९ जानेवारीला होणार असल्याचे बोलले जात आहे. तथापि, निर्मात्यांकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जर शोचा फिनाले १९ जानेवारीलाच झाला, तर शो त्याच्या १८व्या सीझनच्या विजेत्यापासून दूर नाही. यावेळी बिग बॉसची ट्रॉफी कोणाला मिळते हे पाहणे बाकी आहे.