
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
स्टार प्लसवर होणारे इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी (ITA) अवॉर्ड्स हे टेलिव्हिजन जगातील एक मोठे आणि मान्यवर पुरस्कार सोहळा आहे. दरवर्षी हा सोहळा दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यात टेलिव्हिजनमधील सर्वोत्कृष्ट प्रतिभा, अभिनय आणि कथा गौरवली जाते. देशभरातील प्रेक्षकांना हा सोहळा खूप आवडतो. यंदा हा सोहळा खास आहे कारण हा ITA अवॉर्ड्सचा २५ वा वर्ष आहे, म्हणजे सिल्व्हर जुबिली. त्यामुळे यंदाचा पुरस्कार सोहळा अगदी भव्य, उत्साही आणि लक्षात राहणारा ठरला आहे.
२५व्या ITA पुरस्कारांतील अनेक लक्षवेधी पुरस्कारांमध्ये स्टार प्लसच्या ‘उडने की आशा’ मालिकेत सचिनची भूमिका साकारणारा अभिनेता कंवर ढिल्लोनसाठी हा पुरस्कार अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक क्षण ठरला. या ऐतिहासिक पुरस्कार सोहळ्याचा अनुभव सांगताना कंवर म्हणतो “ITA च्या २५व्या वर्षाचा भाग होणं हे खरंच माझ्यासाठी एक समृद्ध संपन्न अनुभव होता. या वर्षी स्टार परिवार सोहळा आणि इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी (ITA) अवॉर्ड्स या दोन्हींच्या सिल्व्हर जुबिली सेलिब्रेशनचा महत्त्वाचा भाग झालो होतो. स्टार परिवार अवॉर्ड्स ज्याचं मी सूत्रसंचालन केलं होतं आणि आता ITA पुरस्कार सोहळा या दोन्ही महत्त्वाच्या टप्प्यांशी जोडला गेल्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी अविस्मरणीय ठरलं आहे.”
या खास विजयानंतर कंवर पुढे म्हणतो “उडने की आशा’ साठी बेस्ट अॅक्टर ज्यूरी अवॉर्ड जिंकणं हा क्षण माझ्यासाठी अतिशय खास होता. माझा पहिलाच ITA पुरस्कार आणि तोही २५व्या वर्षाच्या सोहळ्यात मिळाल्यामुळे हा पुरस्कार माझा आनंद द्विगुणित करणारा आणि म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरला आहे. त्या भव्य मंचावर उभं राहून हातात ट्रॉफी धरलेला तो सुंदर क्षण मी कायम जपून ठेवेन. हा संपूर्ण सोहळा अधिक भावनिक ठरला कारण त्या पुरस्कार सोहळ्यात माझं कुटुंब देखील प्रत्यक्ष प्रेक्षकांमध्ये उपस्थित होत. माझे कुटुंबीय आणि नातेवाईक प्रेक्षकांमध्ये बसून माझ्यासाठी टाळ्या वाजवत होते आणि याहून मोठा सन्मान काय असू शकेल? मागील वर्षी माझ्या अपेक्षा होत्या पण यावेळी मी कोणतीही अपेक्षा न ठेवता आलो होतो आणि त्यामुळे हा विजय आणखी अमूल्य वाटतो”
ITA पुरस्कार सोहळ्यात कंवरने एक दमदार लाईव्ह परफॉर्मन्सही सादर केला ज्यामुळे या पुरस्कार सोहळ्यात आणखी रंगत आली. या परफॉर्मन्सविषयी कंवर म्हणतो, “हा माझा ITA मधील दुसरा परफॉर्मन्स असला तरी ITA च्या मंचावरचा पहिलाच लाईव्ह परफॉर्मन्स असल्याने भरगच्च प्रेक्षकांसमोर लाईव्ह सादरीकरण करण्याची वेगळीच ऊर्जा मी अनुभवत होती आणि यातील प्रत्येक क्षण मी मनापासून एन्जॉय केला. मी माझ्या आवडत्या गाण्यांवर परफॉर्म केलं जो माझा फेव्हरेट झोन आहे आणि प्रणाली, शालीन आणि आशी यांच्यासोबत स्टेज शेअर करणं हे आणखी मजेशीर होतं”
सर्वात खास ITA आठवणीबद्दल कंवर म्हणतो “यंदा बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार जिंकून मंचावर ट्रॉफी हातात घेणं हा माझ्यासाठी सर्वात जपून ठेवण्यासारखा ITA क्षण आहे. अनु रंजन मॅडम, शशी सर आणि संपूर्ण ITA टीमचे मी आभार मानतो जे ही उज्ज्वल परंपरा पुढे नेत आहेत. २५ वर्षांचा प्रवास पूर्ण करणं ही खूप मोठी कामगिरी आहे”
अरे! हे काय घडलं? ‘हा’ प्रसिद्ध साउथ अभिनेता एअरपोर्टवर घसरून पडला, Video Viral
शेवटी चाहत्यांसाठी संदेश देताना कंवर म्हणतो “माझ्यावर सचिनवर आणि ‘उडने की आशा’वर तुम्ही जे प्रेम केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा विजय जितका माझा आहे तितकाच तो तुमचाही आहे. पुरस्कार सोहळा पाहताना तुम्हाला माझा परफॉर्मन्स नक्की आवडेल अशी मला आशा आहे.”
मुखवट्याच्या मागची रहस्यं, 4 खून, शून्य पुरावे…”; ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर चर्चेत