
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोशल मीडिया स्टार ओरी याचे नाव सध्या एका ड्रग्ज प्रकरणात आल्यामुळे तो चर्चेत आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स सेलने त्याला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ओरी पोलीसांसमोर हजर झाला नाही आणि त्याने २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मागितली आहे.
दरम्यान, ओरीचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यासोबत पार्टी करताना दिसतो. दोघांचा हा आकर्षक आणि मजेशीर व्हिडिओ इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होत आहे.या व्हिडिओमुळे ओरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत असून, लोकं त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
ओरी (Orry) आणि उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) दोघेही लाइमलाइटमध्ये कसे राहायचे हे उत्तम प्रकारे जाणतात. अलीकडेच जेव्हा त्यांची भेट झाली, तेव्हा ओरीने अभिनेत्री उर्वशीसोबत एक मजेदार व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत, त्याला खेळकरपणे “माझी नवी शॉर्ट फिल्म” असे नाव दिले.
व्हिडिओच्या सुरुवातीला ओरी उर्वशीला थांबवून चहा पिण्याचे आमंत्रण देतो. त्यानंतर तो तिला १०० रुपयांची नोट देतो आणि मग तिला चहा पिण्यासाठी आपल्या घरी बोलावतो.व्हिडिओ अधिक मजेदार बनवण्यासाठी, ओरीने तो एडिट केला आहे, . त्यात तो असा दावा करतो की त्याने उर्वशीला रस्त्यावर भीक मागताना पाहिले आणि दया दाखवत तिला चहा पाजला. ओरीची ही दया आणि त्याचे वागणे पाहून उर्वशीच्या डोळ्यांत अश्रू आले, असेही तो मजेदार पद्धतीने सांगतो
Akhanda 2 Trailer: महाकुंभमेळ्याची झलक, सनातनच्या रक्षणासाठी बालकृष्ण पोहोचले, ट्रेलरमध्ये धक्कादायक दृश्य
ओरीचा हा मजेदार व्हिडिओ इंटरनेटवर आला आणि लगेचच तो जोरदार व्हायरल झाला. यावर वापरकर्त्यांनीही भरपूर रिअॅक्शन्स द्यायला सुरुवात केली.ओरीच्या या अजबगजब व्हिडिओवर बॉलिवूडच्या मलाइका अरोरा आणि भूमि पेडनेकर यांसारख्या अभिनेत्रीही कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकल्या नाहीत.भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक हिने हा व्हिडिओ “खूप जुना कॉन्सेप्ट” असल्याचे म्हटले, तर करण सिंह छाबडा यांनी ओरीला “एंजल” असे संबोधले.
ड्रग्ज तस्कर मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेखची चौकशी करण्यात आली तेव्हा ओरीचे नाव ड्रग्ज वादात आले. शेखने अधिकाऱ्यांना रेव्ह पार्ट्यांबद्दल माहिती दिली. त्याने खुलासा केला की अनेक प्रमुख बॉलीवूड स्टार या पार्ट्यांमध्ये सहभागी होत आणि ओरी, श्रद्धा कपूर आणि नोरा फतेहीसह अनेक सेलिब्रिटींची नावे घेतली. त्याने दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचेही सांगितले. या गंभीर आरोपांनंतरही, ओरी सोशल मीडियावर सक्रिय राहतो आणि अशा प्रकारचे मजेदार व्हिडिओ बनवून त्याची बेफिकीर वृत्ती दाखवतो.