(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या ‘किंगडम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आज शुक्रवारी, हा अभिनेता त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, विजय देवरकोंडाच्या बहुप्रतिक्षित ‘व्हीडी १४’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांना सर्वात मोठी भेट दिली आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला लुक रिलीज करून अभिनेत्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अभिनेत्याची चित्रपटामधील पहिली झलक पाहून चाहते चकित झाले आहेत. आणि या पोस्टरला भरभरून प्रतिसाद देत आहे.
‘व्हीडी १४’ चा पहिला लुक प्रदर्शित
‘व्हीडी १४’ च्या निर्मात्यांनी विजय देवरकोंडा अभिनीत चित्रपटाचा पहिला लुक रिलीज केला आहे. मैथ्री मूव्ही मेकर्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर त्याचे पोस्टर रिलीज केले आहे, ज्यामध्ये विजय देवरकोंडा योगासनात ध्यान करताना आणि एखाद्या देवाची पूजा करताना दिसत आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अभिनेत्याचा फक्त पाठीचा भाग दिसतो आहे. तसेच हे पोस्टर खूपच आकर्षित दिसत आहे.
पोस्टर शेअर केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
‘व्हीडी १४’ चा पहिला लुक रिलीज करताना, चित्रपट निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘देवांनी त्याला शक्ती दिली आणि युद्धाने त्याला एक उद्देश दिला.’ यासोबतच निर्मात्यांच्या टीमने विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आज वाढदिवसानिमित्त कलाकारांसह चाहते देखील अभिनेत्यावर शुभेच्छचा वर्षाव करत आहेत.
“…मी गे नाहीये”, प्रतीक पाटीलने समलैंगिक असण्याच्या चर्चांवर सोडलं मौन
‘व्हीडी १४’ कधी होणार प्रदर्शित
राहुल सांकृत्यायन दिग्दर्शित आगामी पीरियड ड्रामा चित्रपट, ज्याचे तात्पुरते नाव ‘VD14’ हे ठेवण्यात आले आहे. १८५४ ते १८७८ च्या पार्श्वभूमीवर घडणारी ही एका योद्ध्याची कथा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्ना यात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे. हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मैथ्री मूव्ही मेकर्स बॅनरखाली तयार केला जात आहे.