"...मी गे नाहीये", प्रतीक पाटीलने समलैंगिक असण्याच्या चर्चांवर सोडलं मौन
राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा अभिनेता प्रतीक स्मिता पाटील (Prateik Babbar) गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. नुकतंच त्याने बॉलिवूड बबलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. ज्या गोष्टींमुळे त्याच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल झालाय. दरम्यान, अभिनेत्याने मुलाखतीमध्ये आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याला सुरुवातीच्या काळात लोकं त्याला समलैंगिक (Gay) म्हणून बोलयचे. शिवाय अभिनेत्याला त्याच्या बॉलिवूडच्या करियरमध्ये अनेक वाईट अनुभव आल्याचा खुलासा केला आहे.
‘Housefull 5’ रिलीज आधीच अडकला अडचणीत; युट्यूबवरून डिलीट केला टीझर, नेमकं काय आहे कारण?
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत प्रतीक पाटीलने त्याला बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यावर फार स्ट्रगल करावा लागल्याचे म्हणाला आहे. करियरच्या सुरुवातीला इंडस्ट्रीमधील अनेक लोकं त्याला गे समाजयाचे. तो २० ते २२ वर्षांचा असताना त्याला बॉलिवूडमधल्या लोकांकडून फार अटेंशन मिळाल्याचंही त्याने सांगितलंय. मुलाखतीमध्ये प्रतिकने त्याचं वडिलांसोबत नातं कसं होतं याबद्दल सांगितलं. त्यानंतर त्याने त्याच्या इंडस्ट्रीमधील संघर्षांबद्दल सांगितले. मुसाखती दरम्यान प्रतीक म्हणाला की, “लोक मला करियरच्या सुरुवातील गे समजत होते. बॉलिवूडमध्ये समलैंगिक असणे अजूनही टॅबू आहे. मी प्रत्येकाच्या आवडी- निवडीचा आणि सेक्शुअल ओरिएंटेशनचा आदर करतो. पण मी गे नाहीये, हे मी स्वत: सांगतो.”
ड्रायव्हरच्या लग्नात कुटुंबासोबत सहभागी झाली नेहा कक्कर; वधू- वराला दिले ‘हे’ खास गिफ्ट, Video Viral
२०१७ पासून ‘मी टू’ चळवळ सुरू झाल्यापासून बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक गोष्टी बदलल्या आहेत, त्यापूर्वी लोक त्याला प्रपोज करायचे, असं प्रतीक मुलाखतीत सांगितलं आहे. “मला वयाच्या विशीमध्ये असताना मुलांकडून खूप अटेंशन मिळायचं. परंतु आता, ‘मी टू’ आल्यामुळे लोक थोडे घाबरत आहेत. पूर्वी सगळ्या गोष्टी उघडपणे घडायच्या, लोकं इकडे तिकडे हात लावायचे, त्यामुळे गोष्टी खूप हुशारीने हाताळाव्या लागत होत्या. समलिंगी मुलांना वाटायचं की मीही समलिंगी आहे आणि म्हणूनच लोक मला प्रपोज करायचे.” असं प्रतीक म्हणाला.
‘देशात काय चाललंय आणि याचं काय चाललंय ?’ राहुल वैद्यवर विराट कोहलीचा भाऊ संतापला; पोस्ट Viral
प्रतीकला असं वाटतं की, त्याच्या ‘कोबाल्ट ब्लू’ चित्रपटामुळे तो समलैंगिक असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. चित्रपटातील त्याची भूमिका पाहून लोकांना तो खऱ्या आयुष्यात समलैंगिक आहे असं वाटू लागलं होतं. हॉलिवूड कलाकार त्यांच्या लैंगिकतेबद्दल खूप उघडपणे बोलतात, पण बॉलिवूडमध्ये अद्यापही असं नाही. इथे गे असणं टॅबू आहे, असं मत प्रतीक स्मिता पाटीलने मुलाखतीदरम्यान व्यक्त केलं.