Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजय वर्माने RIP मेसेज असलेला फोटो केला शेअर, अभिनेत्याने चाहत्यांची मागितली माफी!

अभिनेता विजय वर्माचा सोशल मीडियावर चांगला चाहतावर्ग आहे. त्याचा अभिनय आणि कौशल्यशैली चाहत्यांना खूप आवडते. अनेक दिवसांपासून विजय वर्मा तमन्ना भाटियाला डेट करत असल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. तथापि, अभिनेत्याने हे अद्यापही काही सांगितले नाही आहे. आता तो त्याच्या मृत्यूशी संबंधित बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. चाहते त्याच्यावर संतापले असून, त्याने चाहत्यांची माफी मागितली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 07, 2024 | 11:45 AM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कलाकारांना स्वत:ला आणि त्यांच्या कामाचा प्रचार करणे खूप गरजेचे वाटते. परंतु, असे करताना अनेक कलाकार आपली मर्यादा ओलांडतात. कलाकारांना फक्त आपल्या चाहत्यांना संदेश द्यायचा असतो परंतु नंतर ते असं काही करतात की, त्याने चाहते संतापतात आणि त्या अभिनेत्याला ट्रॉल करतात. अलीकडेच विजय वर्मा यांनीही असेच काहीसे केले आहे. आणि ते पाहून त्याच्या चाहत्यांना त्याचा राग आला आहे.

विजय वर्मा हा प्रसिद्ध अभिनेता आहे
विजय वर्मा, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता असून, एक मोठा OTT कलाकार देखील आहे. चाहते त्याला ‘डार्लिंग्स’, ‘लस्ट स्टोरीज 2’ आणि ‘मिर्झापूर’मुळे ओळखतात. डार्लिंग्स चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यामुळेच आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांच्या उपस्थितीतही प्रेक्षकांचे त्याच्या अभिनयावर लक्ष होते. पण अलीकडेच अभिनेता विजय वर्मा यांच्याकडून एक चूक झाली, ज्यासाठी त्याला चाहत्यांची माफी मागावी लागली आहे.

विजयने त्यांच्या मृत्यूशी संबंधित शेअर केली पोस्ट
विजय वर्मा यांनी नुकतीच त्यांच्या मृत्यूशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कॅप्टनच्या लूकमध्ये दिसत आहे. त्यासोबत लिहिले आहे, ‘हमजा अब्दुल शेख. प्रेमळ नवरा आणि जावई. कुराणखानी प्रार्थना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता.विजयची ही पोस्ट पाहून अनेक चाहते आश्चर्यचकित झाले. यावरून लोकांनी त्याला ट्रोलही केले. ‘अशा बातम्या शेअर करून मन दुखवू नका’ अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली आहे. एकाने लिहिले, ‘मला काही सेकंदांसाठी हृदयविकाराचा झटका आला.’ असे प्रतिसाद चाहत्यांकडून अभिनेत्याला येऊ लागले.

विजयने ही पोस्ट का शेअर केली
खरंतर, विजय वर्माच्या डार्लिंग्ज या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात त्याने हमजा शेखची भूमिका साकारली होती. हमजा हा एक माणूस होता जो आपल्या पत्नीला मारहाण करायचा आणि बदला घेण्यासाठी एके दिवशी त्याची पत्नी त्याला मारते. विजयने याचशी संबंधित पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘हमजा आम्हा सर्वांना स्वर्गाच्या सहलीसाठी सोडून दोन वर्षे झाली आहेत. हमजा प्रिये तुझी खूप आठवण येते.’ असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली.

हे देखील वाचा- इलियाना डिक्रूझच्या मुलाला एक वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली भावनिक पोस्ट!

विजय वर्माने चाहत्यांची मागितली माफी
या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये विजय वर्मा यांनी माफीही मागितली आहे. त्याने लिहिले, ‘माफ करा मित्रांनो, तुम्हाला घाबरवण्याचा माझा हेतू नव्हता. हा चित्रपटाचा स्क्रीनशॉट आहे. हा चित्रपटच डार्क कॉमेडी केला आहे म्हणून पोस्ट देखील…’असं लिहून त्याने चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच त्यांना दुखवण्याचा कोणताही हेतू नव्हता हे देखील स्पष्ट करून सांगितले.

Web Title: Vijay varma shared a photo with rip message the actor apologized to his fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 11:41 AM

Topics:  

  • Bollywood News

संबंधित बातम्या

फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’ चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच रचला इतिहास! वाचा सविस्तर…
1

फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’ चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच रचला इतिहास! वाचा सविस्तर…

The Family Man 3: मनोज बाजपेयीची बहुप्रतिक्षित सिरीज कधी आणि कुठे प्रदर्शित होईल, जाणून घ्या त्याची स्टोरी काय आहे?
2

The Family Man 3: मनोज बाजपेयीची बहुप्रतिक्षित सिरीज कधी आणि कुठे प्रदर्शित होईल, जाणून घ्या त्याची स्टोरी काय आहे?

“ती पाणी मागत राहिली…” शेवटच्या क्षणी आईला पाणी देऊ शकला नाही ‘हा’ अभिनेता; म्हणाला,”आठवणी अजूनही…”
3

“ती पाणी मागत राहिली…” शेवटच्या क्षणी आईला पाणी देऊ शकला नाही ‘हा’ अभिनेता; म्हणाला,”आठवणी अजूनही…”

Dharmendra यांच्या प्रकृतीत सुधार; हेमा मालिनी पतीच्या ९० व्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त
4

Dharmendra यांच्या प्रकृतीत सुधार; हेमा मालिनी पतीच्या ९० व्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.