(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा त्याचा नवीन चित्रपट “किस किसको प्यार करूं २” घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यावेळी, गोंधळ दुप्पट होण्याचे आश्वासन दिले आहे. गुरुवारी कपिल शर्माने त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली, जो या वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी कपिल शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. या क्लिपमध्ये संपूर्ण स्टारकास्ट दिसत आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना, विनोदी कलाकाराने कॅप्शनमध्ये लिहिले, “दुप्पट गोंधळ आणि चारपट मजा करण्यासाठी सज्ज व्हा. हास्याचे वादळ असलेला ‘किस किसको प्यार करूं २’ १२ डिसेंबर २०२५ रोजी फक्त चित्रपटगृहात येणार आहे.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच चाहते आता पोस्टवर कंमेंटचा वर्षाव करत आहेत.
‘किस किस को प्यार करूं २’ मधील स्टारकास्ट
कपिल शर्मा व्यतिरिक्त, मनजोत सिंग ‘किस किस को प्यार करूं २’ मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात हिरा वारिना, त्रिधा चौधरी, पारुल गुलाटी आणि आयशा खान यांच्याही भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. कपिल शर्माने यावर्षी ईदला चित्रपटाचा पहिला लूक रिलीज केला होता, परंतु त्याने मुख्य अभिनेत्रीचा चेहरा उघड केला नव्हता. आणि आता नव्या पोस्टरसह अभिनेत्याने संपूर्ण स्टारकास्ट रिलीज केले आहे.
अर्जुन आणि मलायकाचा पॅचअप? मलायकाच्या वाढदिवशी अभिनेत्याने केला प्रेमाचा वर्षाव, म्हणाला….
चित्रपटाचा पहिला भाग २०१५ मध्ये रिलीज झाला
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेला “किस किस को प्यार करूं” हा चित्रपट अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केला होता. हा विनोदी चित्रपट एका पुरूषाभोवती फिरतो जो परिस्थितीमुळे तीन महिलांशी लग्न करण्यास भाग पाडतो. त्याच्या तिन्ही पत्नी एकाचबिल्डिंगमध्ये राहतात, परंतु त्यांना हे माहित नसते की त्यांचा पती एकच आहे. चित्रपटाचा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा तिन्ही बायका त्याच्या चौथ्या लग्नाला उपस्थित राहतात आणि संपूर्ण प्रकरण उघड होते. या चित्रपटात कपिल शर्माने त्याच्या अभिनयाने आणि उत्कृष्ट कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ‘किस किस को प्यार करूं २’ हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.