
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
एस.एन.व्ही. स्टुडिओ (SNV Studioo) च्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच शिवने शूटिंगदरम्यानचा लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून अनेकांना तो खरंच लग्न करतोय असं वाटलं आणि सोशल मीडियावर त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं.इतकंच नाही तर मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी शिवला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. मात्र ही सगळी गम्मत असल्याचं शिवने नंतर स्पष्ट केलं. त्याने ‘पॅक अप’ असं कॅप्शन देत एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितलं की, २०२६ मधील त्याच्या पहिल्या प्रोजेक्टचं शूटिंग पूर्ण झालं आहे.
शिव ठाकरेचा हा नवा प्रोजेक्ट एस.एन.व्ही. स्टुडिओ अंतर्गत तयार होत असून, त्याची निर्मिती वैशाली काळे, नितीन घुगे आणि सागर सकट यांनी केली आहे. या प्रोजेक्टचं दिग्दर्शन सागर सकट करत आहेत.
अभिनेता शिव त्याच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतो, “वर्षातला हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. २०२६ मधला हा माझा सगळ्यात जवळचा प्रोजेक्ट आहे. मला (SNV Studioo) एसएनवी स्टुडिओसोबत काम करताना खूप मज्जा आली. या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळ पाहायला मिळणार आहे. लवकरच हा प्रोजेक्ट तुमच्या भेटीला येणार आहे.”
निर्मात्या वैशाली काळे त्यांच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतात, “आमच्या (SNV Studioo) एस.एन.वी. स्टुडिओच्या नव्या वर्षातील नवीन प्रोजेक्टला नुकतीच सुरुवात अगदी दिमाखात आणि उत्साहात झाली आहे. आम्ही नेहमीच प्रेक्षकांसाठी हृदयाला भिडणाऱ्या कथा घेऊन आणण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रोजेक्टमध्ये देखील तुम्हाला काहीतरी नव पाहण्याचा अनुभव मिळेल याची आम्हाला खात्री आहे. यावेळी आम्ही पहिल्यांदाच प्रसिद्ध शिव ठाकरे याच्या सोबत काम केल आहे आणि हा अनुभव अतिशय छान होता. शीव ठाकरे हा मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता असून त्याच्या अभिनयामुळे आणि कामातील उत्साहामुळे आमच्या टीमला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळाली. यामुळे आमच्याकडून एक सुंदर कलाकृती निर्माण होईल असा विश्वास आहे. (SNV Studioo) एस.एन.वी. स्टुडिओच पहिल प्रोजेक्ट हे अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. “तुला ना कळे” या गाण्याला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला. तसंच या ही प्रोजेक्टची खूप उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. ते पाहून आनंद होत आहे.“
अभिनेता शिव ठाकरे प्रमुख भूमिका असलेला हा प्रोजेक्ट कोणता असेल तसेच त्याच्या सोबत ही कोणती अभिनेत्री आहे याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली आहे.