(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ChatGPT वरून लिहिला गेला Stranger Things चा शेवटचा सीझन? वेब सीरिजमध्ये चाहत्यांना ‘हे’ काय दिसले?
‘डाव मोडू नको’ या गाण्याचे मूळ गायक सुधीर फडके असून त्याला राम फाटक यांचे अजरामर संगीत लाभले होते. आता या गाण्याला नवसंजीवनी मिळाली असून, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांनी ते आपल्या खास शैलीत सादर केले आहे. या रिक्रिएटेड व्हर्जनला कुणाल करण यांचे साजेसे, आधुनिक तरीही मूळ आत्मा जपणारे संगीत लाभले आहे. हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे.
गाण्याबद्दल सांगताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “‘डाव मोडू नको’ हे केवळ गाणं नाही, तर प्रत्येक घरात कधी ना कधी निर्माण होणाऱ्या नात्यांतील तणावाचं प्रतिबिंब आहे. संवाद थांबला की नात्यांमध्ये अंतर वाढतं, आणि हेच वास्तव आम्ही या गाण्यात मांडलं आहे. आजच्या काळातील कुटुंबांमधील बदलतं नातेसंबंधाचं चित्र या नव्या सादरीकरणातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.” तसेच चाहते या गाण्याला नक्की प्रतिसाद देतील अशी आशा आहे.
‘अगं अगं सूनबाई..’ केदार शिंदे यांच्या चित्रपटामधून उलगडणार सासू-सुनेचे नवे भावविश्व
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई ! मी काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारी पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.






