Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर पोहचण्याचा कायम अभिमान आहे’, असे का म्हणाल्या छाया कदम!

छाया कदम यांच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' ला 82 व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर यांना श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर पोहचण्याबाबत अभिनेत्रीला अभिमान

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 11, 2024 | 03:22 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

छाया कदम यांनी 2024 वर्षात विविध भूमिका साकारल्या आणि त्या जागतिक स्तरावर जाऊन पोहचल्या आहेत. नुकताच त्यांचा ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ ला 82 व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. आणि महत्त्वाची बाब अशी ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ एकूण दोन नामांकने मिळाली असून दुसरी एक सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चरसाठी मिळाले आहे. विशेष म्हणजे या श्रेणीमध्ये भारतीय दिग्दर्शकाचे नामांकन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

छाया कदम यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’चा प्रीमियर 23 मे रोजी 2024 कान्स चित्रपट महोत्सवात झाला होता आणि तो आता चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच अनेक पुरस्कार पटकावले आहेत आणि आता वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळवण्याचा बहुमान देखील पटकावला आहे. या बातमीने अभिनेत्रीला चांगलाच आनंद झाला आहे.

काही दिवसापूर्वी ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट’ या चित्रपटाला न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलमध्ये (NYFCC) सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे आणि आता हा चित्रपट पुन्हा एक नवा पुरस्कार जिंकण्यासाठी सज्ज होताना दिसतो आहे.

या बद्दल उत्सुकता व्यक्त करताना छाया कदम म्हणाल्या, “ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’साठी मिळालेलं गोल्डन ग्लोब नामांकन हे माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर पोहोचतोय, याचा आनंद वाटतो. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळ आहे. तो मानवी भावना, संघर्ष आणि प्रकाशाच्या शोधाबद्दल आहे. माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झालं. या नामांकनाने आम्हाला पुढे आणखी उत्तम कथा सांगण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. प्रेक्षकांनी दाखवलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी मनःपूर्वक आभारी आहे.” असे अभिनेत्रीने सांगितले.

तीन महिन्यांची झाली रणवीर-दीपिकाची मुलगी दुआ, आजी अंजू भवनानीने दान केले स्वतःचे केस!

काय आहे या चित्रपटाची कथा?
चित्रपटाची कथा प्रभा आणि अनु या दोन परिचारिकांची आहे. दोघेही मलियाली असून मुंबईत राहतात. दोघेही आपापल्या नात्यात संघर्ष करताना या चित्रपटामध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत तिसरी स्त्री देखील आहे तिचे नाव पार्वती आहे. संपूर्ण चित्रपटाची कथा यांच्याभोवती फिरते आहे. आजही समाजात स्त्रीची काय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. आजही, ती आपले संपूर्ण आयुष्य इतरांची मदत आणि काळजी घेण्यात घालवते आणि त्या बदल्यात काहीही मिळत नाही हे या चित्रपटातून स्पष्ट केले आहे. हा चित्रपट स्त्रीवादी विचारसरणीला बळ देणारा आहे.

‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट’मध्ये छाया कदम, कानू कुसरुती, दिव्या प्रभा आणि यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट फ्रान्समधील ‘पेटीट काओस’ आणि भारतातील ‘चॉक अँड चीज’ आणि ‘अनदर बर्थ’ यांची अधिकृत इंडो-फ्रेंच सहनिर्मिती आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना देखील खूप आवडला आहे.

Web Title: Why did chhaya kadam say i am always proud that indian cinema has reached the global stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 03:22 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
1

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!
2

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
3

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’
4

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.