
फोटो सौजन्य - Social Media
सिद्धार्थ कन्नन यांच्या मुलाखतीत बोलताना शगुफ्ता अली यांनी ‘हीरो नं. 1’च्या शूटिंगदरम्यानचे अनुभव सांगितले. त्यांनी करिश्मा कपूरच्या मेहनतीचे आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचे कौतुक करताना, ती अत्यंत शिस्तप्रिय आणि कामाबाबत समर्पित असल्याचे सांगितले. मात्र, त्याचवेळी ती खूप महत्त्वाकांक्षी होती आणि तिच्या वागण्यात काहीसा अॅटिट्यूड जाणवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गोविंदा आणि करिश्मा यांनी एकत्र चित्रपट करणे का थांबवले, असा प्रश्न विचारला असता शगुफ्ता म्हणाल्या की, त्यामागे दोघांमधील परस्पर रस कमी झाला असावा. त्यांच्या मते, कोणतीही ऑनस्क्रीन जोडी दीर्घकाळ यशस्वी राहण्यासाठी कलाकारांमध्ये चांगला संवाद, समन्वय आणि परस्पर आदर असणे आवश्यक असते. अतिमहत्त्वाकांक्षा काहीवेळा नात्यांवर परिणाम करू शकते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, हा त्यांचा वैयक्तिक अंदाज असल्याचे स्पष्ट करत त्यांनी या विषयावर कोणताही ठोस दावा केला नाही.
गोविंदाबद्दल बोलताना शगुफ्ता अली यांनी त्याच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाचेही विशेष कौतुक केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, गोविंदा प्रत्येक दृश्यासाठी अनेक वेळा रिहर्सल करत असे आणि सर्वोत्तम शॉट मिळावा यासाठी 25 ते 30 रीटेक घेण्यासही तयार असे. प्रत्येक रीटेकनंतर तो सहकलाकारांची माफी मागत असे. दिग्दर्शक डेव्हिड धवन सीन ओके म्हणाल्यानंतरही तो आणखी चांगला शॉट देण्याचा प्रयत्न करत असे, अशी आठवण त्यांनी सांगितली.
Hemant Dhome Poet: “गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप…” हेमंत ढोमेंची कविता सोशल मीडियावर व्हायरल
मात्र, गोविंदाची सेटवर उशिरा पोहोचण्याची सवय अनेकदा चर्चेचा विषय ठरत असे. शगुफ्ता यांच्या मते, अभिनेते कादर खान यांनाही त्याच्या या सवयीचा त्रास होत असे. तरीही गोविंदाच्या अभिनयकौशल्यामुळे आणि कामावरील निष्ठेमुळे सर्वजण त्याचा आदर करत होते.
दरम्यान, गोविंदा आता तब्बल सात वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच त्याने ‘रूपा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून, या चित्रपटातून तो आपल्या कारकिर्दीची नवी इनिंग सुरू करणार आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.