Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govinda: कोमल राणीसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला गोविंदा; नेटकऱ्यांना खटकली ‘ही’ गोष्ट

Govinda: गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकर यांनी एकत्र लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुनीता आहुजांची पुन्हा चर्चा सुरू झाली.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 23, 2026 | 11:35 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Govinda:  बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकर यांच्या कथित अफेअरच्या बातम्यांनी जोर धरला होता. आता पुन्हा एकदा हे दोघे एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी गोविंदा मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत कोमल राणीही दिसली.

गोविंदा-कोमल राणीचा व्हिडीओ व्हायरल

लालबागच्या राजाच्या मंडपात गोविंदा आणि कोमल राणी यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. दोघांनी प्रसाद अर्पण केला आणि पूजेतही सहभाग घेतला. यावेळी पुजाऱ्यांनी त्यांच्या कपाळावर टिळा लावला. दर्शन घेतल्यानंतर गोविंदा बाहेर आला आणि तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांना हात दाखवत त्यांच्याशी संवाद साधला. तो यावेळी आनंदी आणि हसतमुख दिसत होता.

गोविंदा आणि कोमल राणी एकत्र दर्शन घेत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या कथित जवळीकीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सुनीता आहुजांच्या वक्तव्याने वाढल्या होत्या चर्चा

ऑगस्ट महिन्यात गोविंदा आणि कोमल राणी विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबतच्या चर्चांना अधिकच जोर आला. याचदरम्यान गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी पापाराझींशी बोलताना गोविंदा आणि कोमल राणी यांच्या कथित अफेअरबाबत वक्तव्य केल्याचं समोर आलं होतं.

सुनीता यांनी गोविंदासोबत कोमल राणीच्या जवळिकीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरण्यावरून त्यांनी गोविंदाला टोमणाही मारला होता. या सगळ्या चर्चांनंतर दोघांच्या वैवाहिक नात्याबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, नंतर सुनीता आहुजा यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याचं सांगितलं गेलं.

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज

गोविंदाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

गोविंदा आणि कोमल राणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी गोविंदावर टीका केली, तर काहींनी सुनीता आहुजांना पाठिंबा दिला.

एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जे आपल्या पत्नीला त्रास देतात, त्यांची प्रार्थना देवसुद्धा ऐकत नाही.” तर दुसऱ्या युजरने सुनीता आहुजांना उद्देशून, “सुनीताजी, आम्ही तुमच्यासोबत आहोत,” अशी कमेंट केली.

एका युजरने थेट प्रश्न विचारला, “त्याने या बाईशी लग्न केलं आहे का?” तर आणखी एका कमेंटमध्ये लिहिलं होतं, “सुनीता मॅडम कुठे आहेत? तुम्ही त्याच्यासोबत दर्शनासाठी यायला हवं होतं; तुम्ही अजूनही त्याच्याशी विवाहित आहात.”

गोविंदा आणि कोमल राणी यांच्यात नेमकं काय नातं आहे, याबाबत दोघांकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. मात्र, लालबागच्या राजाच्या दर्शनाचा त्यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.

Yami Gautam: यामी गौतमच्या शिरपेचात मानाचा तुरा; पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळताच पती आदित्य धर भावूक

Web Title: Govinda komal rani lalbaugcha raja darshan sunita ahuja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Govinda

संबंधित बातम्या

Drishyam 3: विजय साळगावकरची कथा इथेच संपणार? ‘दृश्यम 4’बाबत दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा
1

Drishyam 3: विजय साळगावकरची कथा इथेच संपणार? ‘दृश्यम 4’बाबत दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Yami Gautam: यामी गौतमच्या शिरपेचात मानाचा तुरा; पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळताच पती आदित्य धर भावूक
3

Yami Gautam: यामी गौतमच्या शिरपेचात मानाचा तुरा; पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळताच पती आदित्य धर भावूक

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
4

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.