sahil khan
नुकतचं केंद्र सरकारने बेकायदेशीर बेटिंग ॲप महादेवसह 22 बेटिंग सॉफ्टवेअर आणि वेबसाइट ब्लॉक (Mahadev Betting App Ban) केल्या आहेत. ईडीच्या (ED) कारवाईनंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली. त्यानंतर नुकतचं महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्यासह 31 जणांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणी नवी अपडेट आली आहे. या 31 जणांमध्ये स्टाईल चित्रपच फेम अभिनेत साहिलं खानंच (sahil Khan) देखील नाव समोर आलं आहे. यामध्ये साहीलचं नाव 26 व्या क्रमांकावर आहे. या प्रकरणाची एफआयआर कॅापी समोर आल्यानंतर हा धक्कादाक खुलासा झाला.
[read_also content=”Mahadev Betting Appआधी केंद्र सरकारकडून महादेव बेटिंग ॲप बॅन, आता मुंबई पोलिंसाकडून प्रवर्तक सौरभ चंद्राकरवर गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/crime/case-registered-against-mahadev-gaming-app-promotor-saurabh-chandrakar-in-mumbai-police-nrps-478878.html”]
साहिल खानवर महादेव अॅपचा प्रचार आणि प्रचार करण्यासोबतच त्यातून मोठा नफा कमावल्याचा आरोप आहे. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर साहिलविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेटिंग अॅप्सच्या माध्यमातून लोकांची 15 हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अलीकडेच अनेक सट्टेबाजी आणि गेमिंग अॅप्सवर विविध एजन्सींनी केलेल्या कारवाईनंतर ईडीच्या रडारवर अनेक बॉलिवूडमधील कलाकार आले होते. गेल्या काही आठवड्यात अॅपच्या काही प्रवर्तकांना अटकही करण्यात आली आहे.