Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बॅास विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल, विषारी सापांची तस्करी आणि रेव्हपार्टीत ड्रग्स पुरवल्याचा आरोप!

'बिग बॉस' विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 03, 2023 | 01:14 PM
बिग बॅास विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल, विषारी सापांची तस्करी आणि रेव्हपार्टीत ड्रग्स पुरवल्याचा आरोप!
Follow Us
Follow Us:

बिग बॅास ओटीटी 2 चा विजेता आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) सध्या अडचणीत आला आहे. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर विषारी सापांची तस्करी आणि बेकायदेशीरपणे रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे.

[read_also content=”बोल्ड कपडे घातल्याबद्दल उर्फी जावेदला अटक? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल! https://www.navarashtra.com/movies/urfi-javed-aka-uorfi-arrested-for-her-bold-clothes-police-officers-take-her-into-custody-video-goes-viral-nrps-477172.html

नेमकं प्रकरण काय?

नोएडा आणि एनसीआरच्या इतर शहरांमध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याबद्दल आणि त्यासाठी परदेशी मुलींना आमंत्रित केल्याबद्दल प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव यांच्यासह सहा नाव आणि काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध सेक्टर-49 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापांची तस्करी करत असल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, पीएफए ​​या संस्थेने तक्रार दाखल केली होती की, एल्विश यादव नावाचा यूट्यूबर त्याच्या टोळीसह सापाचे विष आणि जिवंत साप पुरवतो. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून काही जणांना अटक केली.  घटनास्थळावरून पाच जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बदरपूर येथील राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ यांचा समावेश आहे. झडती घेतली असता राहुलच्या कमरेला लटकलेल्या पिशवीत सापाच्या विषाने भरलेली प्लास्टिकची बाटली सापडली. प्रत्येकाच्या जवळ नऊ जिवंत साप आढळले. ज्यामध्ये पाच कोब्रा, एक अजगर, एक घोड्याच्या शेपटीचा साप आणि दोन दोन डोकी असलेल्या सापांचा समावेश आहे.

कोण आहे एल्विश यादव

एल्विश यादव हा एक प्रसिद्ध YouTuber आणि सोशल मीडिया इन्फुएन्सर आहे. 2016 मध्ये त्याने यूट्यूबचा प्रवास सुरू केला, एल्विशचे YouTube वर वेगवेगळे 3 चॅनेल आहेत. सर्व चॅनेलवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. ‘Elvish Yadav Vlogs’ वर तो रोजचे अपडेट Vlog शेअर करतो, तर ‘Elvish Yadav’ वर तो त्याच्या शॉर्ट फिल्म अपलोड करतो. एल्विश यादव सेलेब्सचे रोस्टिंग व्हिडिओ देखील बनवतो, ज्यासाठी तो सर्वात प्रसिद्ध आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 13 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. एल्विश यादव बिग बॉसचा विजेता ठरला आहे. या शोच्या इतिहासात पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड स्पर्धकाने विजेत्याची ट्रॉफी जिंकली आहे.

Web Title: Case registered against ott big boss winner elvish yadav for smuggling poisonous snakes and organizing rave party illegally nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2023 | 01:14 PM

Topics:  

  • big boss winner
  • entertainment

संबंधित बातम्या

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
1

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!
2

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर
3

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.