Chhaava Movie
विकी कौशलचा ऐतिहासिक ‘छावा’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून चित्रपटाला भरभरून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दमदार कमाई केल्यानंतर, आता दुसऱ्या दिवशीही लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाने आपली तगडी कमाई करत बॉक्स ऑफिसवर ताकद दाखवली.
दिल्लीत युट्युबर Lakshay Chaudhary च्या गाडीवर हल्ला! सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
पहिल्या दिवशीच्या भरघोस प्रतिसादानंतर दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी पाहायला मिळाली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘छावा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2025 सालचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा हिंदी चित्रपटाचा मान मिळवला आहे. शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने ३३.०१ कोटींची कमाई केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केल्यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३७ कोटींची कमाई केलेली आहे. दोन दिवसांत चित्रपटाने देशात बॉक्स ऑफिसवर ६८ कोटींची कमाई केलेली आहे. या कमाईचा आकडा सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिली आहे.
देशभरातील कमाईचा आकडा वाढत असताना जगभरातीलही कमाईचा आकडा वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो ‘हाऊसफुल्ल’ म्हणून दाखवले जात आहे. विकी कौशलच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरुन दाद मिळत आहे. बिगेस्ट ऑपनरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांनाही ‘छावा’ चित्रपटाने मागे टाकले आहे. ‘गली बॉय’ने पहिल्या दिवशी १९.४० कोटी कमावले होते, तर ‘छावा’ ने ३३.१ कोटी रूपयांची ओपनिंग केली. ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.३० कोटी रूपयांची कमाई केली होती, तर ‘छावा’ने दोन दिवसांतच ५० कोटींपेक्षाही अधिकची मजल मारली आहे. ‘स्काय फोर्स’ने ३ दिवसांत ५० कोटी कमावले, पण ‘छावा’ने हा टप्पा केवळ २ दिवसांत पार करत सर्वांचेच लक्ष वेधले.
अजय- काजोलच्या लेकीला पाहून तब्बू का रडायला लागली ? स्वत: तिनेच सांगितला किस्सा
‘छावा’ चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदान्नाने संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात डायना पेंटी, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. १३० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या ‘छावा’ चित्रपटाने दोन दिवसांतच १०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केलेली आहे.