फोटो सौजन्य: सोशल मीडिया
‘दृश्यम’, ‘दृश्यम २’, ‘औरों मैं कहाँ दम थाँ’, ‘गोलमाल अगेन’, ‘फितूर’ आणि ‘दे दे प्यार दे’सह अनेक चित्रपटांच्या माध्यमातून अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. अजय देवगण आणि तब्बूची ऑनस्क्रीन जोडी कमालीची हिट ठरली आहे. त्या दोघांचेही बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलीये. सध्या सोशल मीडियावर तब्बूचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामध्ये तब्बू जेव्हा अजय- काजोलची लेक न्यासा देवगणला पहिल्यांदाच भेटते तेव्हाचा किस्सा सांगताना दिसते. तो किस्सा सांगत असताना ती भावनिक झाली.
दुखापतीतून बरा होऊन विजय देवरकोंडा पोहचला ‘किंगडम’च्या शुटिंगला, चित्रपटाची नवीन अपडेट आली समोर
तब्बूच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तब्बू न्यासाबद्दल बोलताना दिसतेय. ती म्हणते, “अजयचं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगी होती. मला वाटलं की, तो वडिल झालाय? या गोष्टीला मी केव्हाच स्वीकारू शकत नाही.” ती पुढे म्हणाली, “आणि मग मी ‘फना’च्या शूटिंगदरम्यान न्यासाला पाहिले. तेव्हा ती आली होती. ती तेव्हा खूप लहान होती आणि तिला पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले आणि विचार केला, अरे देवा, ही माझ्या मित्राची मुलगी आहे. ”
अभिनेत्रीने पुढे सांगितले की, न्यासाची आई (काजोल) सुद्धा तिच्यासोबत होती. न्यासाला पाहून तब्बूची आई म्हणते की, “न्यासा अजय देवगणची पूर्ण कार्बन कॉपी आहे.” तब्बूने सांगितले की, तिच्या चालण्याची आणि बोलण्याची पद्धत पाहून माझ्या आईला वाटलं की ती अजयचीच कार्बन कॉपी आहे. काजोल आणि आमिर खानने ‘फना’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. तर, न्यासाचा जन्म एप्रिल २००३ मध्ये झाला. जेव्हा तब्बू न्यासाला सेटवर भेटली तेव्हा ती फक्त तीन वर्षांची होती.
अजय देवगण आणि तब्बूची जोडी पडद्यावर खूप गाजली आहे. दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्रही आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत काम करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तब्बू अजय आणि काजोलची मुलगी न्यासा देवगणला पहिल्यांदा भेटली तेव्हाचा क्षण आठवताना दिसते. तब्बूने सांगितले की ती खूप भावनिक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रूही आले. तब्बू फॅन क्लबने सोशल मीडियावर हा जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री न्यासाबद्दल बोलताना दिसत आहे.
तब्बू आणि अजय देवगण यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांनीही १९९४ मध्ये ‘विजयपथ’, २०१५ मध्ये ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दे प्यार दे’, ‘दृश्यम २’, ‘औरों में कहां दम था’ यासह अनेक चित्रपटांत एकत्र केले आहे. त्याचे अनेक चित्रपट हिट झाले. एका मुलाखतीत, तब्बूने सांगितले होते की, ती अजयला तो १२-१३ वर्षांचा असल्यापासून ओळखते. तो तिच्या भावाचा बालपणीचा मित्र होता.