प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav Heath Update) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्याासाठी चाहत्यांचे लक्ष लागलेल आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत दरम्यान रुग्णलयातून त्यांची हेल्थ अपडेट समोर आली आहे.
[read_also content=”रक्षाबंधन आटोपून येणाऱ्या सहा जणांवर काळाचा घाला; कार, दुचाकी आणि ऑटो रिक्षात धडक https://www.navarashtra.com/india/six-died-after-car-rams-into-auto-rickshaw-motorbike-in-gujarat-nrps-315080.html”]
राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. राजू सध्या व्हेंटिलेटरवर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. दरम्यान, त्यांच्या मुलीने वडिलांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांची बीपी काही काळासाठी नॉर्मल झाली होती. त्यांच्या पायात काही प्रमाणात हालचालही झाल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीतील हा सुधार फार काळ टिकला नाही. त्यांची बीपी पुन्हा कमी-जास्त होत आहे. त्यामुळे आता त्यांच्या हृदया ऐवजी त्यांचा मेंदू डॉक्टरांसाठी आव्हानत्मक ठरत आहे. अजूनही त्यांचा मेंदू प्रतिसाद देत नाहीय. त्यामुळे डॉक्टारांची चिंता वाढली आहे. तसेच राजू 43 तासांपेक्षा जास्त काळ व्हेंटिलेटरवर आहेत.राजूच्या उपचारासाठी कार्डिओलॉजी, क्रिटिकल केअर, गॅस्ट्रोलॉजी टीम तसेच न्यूरोलॉजी टीम तैनात करण्यात आली आहे.
[read_also content=”उत्तरप्रदेशमध्ये यमुनेत बोट बुडून तिघांचा मृत्यू , 17 जण बेपत्ता https://www.navarashtra.com/india/boat-sinks-in-yamuna-in-uttar-pradesh-three-dead17-missing-nrps-315058.html”]