comedian raju srivastavas situation is critical the doctor told the situation pm modi cm yogi rajnath singh give help nrvb
मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Stand Up Comedian Raju Srivastava) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. दोन दिवस उलटूनही त्यांची प्रकृती चिंताजनक (Critical) आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे (Admitted To AIIMS Hospital, Delhi). डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
एम्सशी संबंधित सूत्रांनी शुक्रवारी IANS ला सांगितले की, ‘राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असून ते ICU त आहेत. त्यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना डॉक्टरांच्या कडक निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. राजू श्रीवास्तव गेल्या ४६ तासांपासून शुद्धीवर आलेले नाहीत.
[read_also content=”प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या बद्दल कॉमेडियन एहसान कुरेशी यांची ‘ही’ माहिती https://www.navarashtra.com/movies/comedian-ehsan-qureshis-information-about-famous-comedian-raju-srivastava-nrps-315176.html”]
त्यांचा मेंदू मृत (Brain Dead) झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून त्यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नाही (No Response To Treatment). ५८ वर्षीय राजू श्रीवास्तव यांना बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया (Angioplasty Surgery) करण्यात आली. राजू श्रीवास्तव यांचे मित्र आणि कॉमेडियन एहसान कुरेशी यांनी पोर्टलला सांगितले की, तो गेल्या २५-३० तासांपासून बेशुद्ध आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचा मेंदू पूर्णपणे कार्य करत नाही आणि ते उपचारांना प्रतिसादही देत नाही.
[read_also content=”७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त Jio ची Paisa Vasool ऑफर, फ्रीमध्ये रिचार्ज करा हा वार्षिक प्लान https://www.navarashtra.com/technology/this-independence-day-reliance-jio-also-celebrate-75-years-with-3-new-jio-offers-know-details-in-marathi-here-nrvb-315180.html”]
कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.